गुलाबी रंग मुलींचा आणि निळा मुलांचा हे कोणी ठरवलं? रंगांमधील हा फरक कधीपासून सुरु झाला तुम्हाला माहितीय?

Last Updated:

काही शतकांपूर्वी या रंगांचा अर्थ अगदी उलट होता? होय! पूर्वी गुलाबी रंग हा पुरुषत्व, शक्ती आणि जोशाचं प्रतीक मानला जात होता. चला, जाणून घेऊया गुलाबी रंगाच्या या मनोरंजक इतिहासामागचं रहस्य.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : आजच्या काळात आपण प्रत्येक गोष्ट रंगांशी जोडतो. कपडे, खेळणी, सजावट, अगदी लिंग ओळखीसुद्धा. मुलांचा रंग निळा, तर मुलींचा रंग गुलाबी हे ठरलेलं समीकरण झालं आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, की अशी ओळख किंवा असं मानण्याची प्रथा कधीपासून सुरु झाली. या अशा रंगांची विभागणी कोणी आणि कुठून केली?
खरंतर काही शतकांपूर्वी या रंगांचा अर्थ अगदी उलट होता? होय! पूर्वी गुलाबी रंग हा पुरुषत्व, शक्ती आणि जोशाचं प्रतीक मानला जात होता. चला, जाणून घेऊया गुलाबी रंगाच्या या मनोरंजक इतिहासामागचं रहस्य.
पूर्वी पिंक किंवा गुलाबी रंगाचं महत्त्व काय होतं?
18व्या शतकात गुलाबी रंग कोणत्याही लिंगाशी जोडला जात नव्हता. त्या काळात तो शक्ती, सामर्थ्य आणि उत्साहाचं प्रतीक मानला जायचा. फ्रान्सच्या राजा लुई XV यांची प्रेयसी मॅडम डी पोम्पाडोर हिने गुलाबी रंग आपल्या पोशाखांत मोठ्या प्रमाणात वापरायला सुरुवात केली आणि तिच्यामुळेच "पोम्पाडोर पिंक" हा रंग लोकप्रिय झाला.
advertisement
रंगांना लिंगाशी जोडण्याची सुरुवात कधी झाली?
19व्या शतकात कपड्यांच्या डिझाइनमध्ये लिंगानुसार रंगांचा वापर होऊ लागला. त्या वेळी गुलाबी रंग मुलांसाठी आणि निळा रंग मुलींसाठी वापरला जाई. गुलाबी रंग शक्ती आणि धैर्याचं प्रतीक मानला जायचा, तर निळा रंग कोमलता आणि शांततेचं द्योतक मानलं जायचं.
नंतर बदल कसा झाला?
20व्या शतकाच्या मध्यात सर्वकाही उलटं झालं. मार्केटिंग आणि जाहिरातींच्या प्रभावामुळे गुलाबी रंगाला महिलांचा रंग म्हणून ओळख मिळाली आणि निळा रंग पुरुषांसाठी मानला जाऊ लागला. या बदलामागे व्यापार आणि समाजातील बदलती मानसिकता यांचा मोठा वाटा होता.
advertisement
गुलाबी रंगाला लोकप्रियता कोणी दिली?
1950 साली अमेरिकेच्या तत्कालीन फर्स्ट लेडी मॅमी आयझनहॉवर यांनी आपल्या शपथविधी सोहळ्यात गुलाबी रंगाचा गाउन परिधान केला होता. त्या दिवसानंतर पिंक रंग महिलांमध्ये फॅशनचा प्रतीक बनला आणि आजही तो स्त्रीत्वाचं प्रतिनिधित्व करतो.
थोडक्यात, गुलाबी रंगाचा प्रवास 'शक्ती'पासून ‘कोमलता’कडे झाला आणि या बदलातून समाजाच्या विचारांतील परिवर्तन स्पष्ट दिसतं.
view comments
मराठी बातम्या/Viral/
गुलाबी रंग मुलींचा आणि निळा मुलांचा हे कोणी ठरवलं? रंगांमधील हा फरक कधीपासून सुरु झाला तुम्हाला माहितीय?
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement