भारताचा समुद्र, नाव मात्र अरब देशाचं; अरबी समुद्राच्या नावामागची खरी गोष्ट 99 टक्के लोकांना माहितच नाही
- Published by:Devika Shinde
Last Updated:
खरंतर यामागचं कारण हे इतिहासात लपलेलं आहे. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
मुंबई : लहानपणापासून आपण शाळेत शिकलो आहोत आणि पुस्तकात वाचलं देखील आहे की भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर अरबी समुद्र आहे. पण कधी विचार केला आहे का, या समुद्राला अरब देशाचं नाव का दिलं गेलं? त्याला भारतीय समुद्र देखील नाव देता आलं असतं ना? मग असं का नाही केलं?
खरंतर यामागचं कारण हे इतिहासात लपलेलं आहे. ज्याबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे.
अरबी समुद्र हा हिंद महासागराचा एक भाग आहे. तो भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर पसरलेला आहे. त्याच्या उत्तरेस पाकिस्तान, पश्चिमेस इराण आणि दक्षिणेस भारत आहे. हा समुद्र भारताला अरबी द्वीपकल्पापासून वेगळं करतो.
खूप वर्षांपूर्वी हा समुद्र व्यापारी मार्ग म्हणून प्रसिद्ध होता. अरब देशांतील व्यापारी आणि खलाशी या मार्गाने भारतात येत असत. ते मसाले, कापड आणि इतर वस्तूंचा व्यापार करत. या व्यापाऱ्यांचा या भागावर मोठा प्रभाव पडला आणि त्यामुळे या समुद्राला ‘अरबी समुद्र’ असं नाव पडलं.
advertisement
या व्यापारामुळे भारतीय आणि अरब व्यापाऱ्यांमध्ये सांस्कृतिक देवाणघेवाणही झाली. मुंबई, गुजरात आणि गोवा यांसारख्या शहरांचा या व्यापाराशी थेट संबंध होता. त्यामुळे या किनाऱ्यावर अरब संस्कृतीचा प्रभाव दिसून आला.
अरबी समुद्र हे नाव फक्त भौगोलिक ओळख नाही, तर ते त्या काळातील व्यापार, संपर्क आणि सांस्कृतिक नात्याचं प्रतीक आहे. त्यामुळेच याला अरबी समुद्र असं नाव मिळालं.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 02, 2025 6:15 PM IST
मराठी बातम्या/Viral/
भारताचा समुद्र, नाव मात्र अरब देशाचं; अरबी समुद्राच्या नावामागची खरी गोष्ट 99 टक्के लोकांना माहितच नाही


