थंडी सुरू झाली की काही गोष्टींना हात लावताच शॉक का बसतो? यामागचं सायन्स आणि उपाय जाणून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
असं आपल्यासोबत का होतं आहे? थंडीच्या दिवसांत हे जास्त का होतं? शरीरात काय प्रक्रिया होते? आणि यावर उपाय काय? हे अनेकांना माहित नसतं.
मुंबई : हिवाळा सुरू झाला की अनेकांना एक विचित्र अनुभव येतो. धातूचे दरवाजे, कारचं हँडल, घरातील टॅप, फ्रिजचं दार किंवा अगदी स्वेटर काढताना देखील एक हलकाचा झटका बसल्यासारखं वाटतं. कधी ते फक्त जाणवतं तर कधी त्याचा आवाज देखील येतं. असं आपल्यासोबत का होतं आहे? थंडीच्या दिवसांत हे जास्त का होतं? शरीरात काय प्रक्रिया होते? आणि यावर उपाय काय? हे अनेकांना माहित नसतं.
थंडीमध्ये शॉक का जास्त बसतो? चला वैज्ञानिक कारण जाणून घेऊ
हिवाळ्यात वातावरण कोरडं होतं. हवेतलं ओलसरपण कमी होतं आणि air humidity घटते. या कोरड्या हवेमुळे स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी (static electricity) जलद तयार होते.
स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी म्हणजे काय?
आपल्या कपड्यांवर, त्वचेवर किंवा इतर वस्तूंवर रगडण्यामुळे सूक्ष्म विद्युतभार जमा होतो. हा भार तिथेच अडकून राहतो.
advertisement
उदाहरणार्थ स्वेटर, ब्लॅंकेट, कार सीट, घरात फिरताना चप्पल घासणे, दरवाजा सतत उघडल्यामुळे तुमचे हात किंवा इतर गोष्टींचं या भागांवर घर्षण होतं. या क्रियेमुळे शरीरावर विद्युतभार जमा होतो. जेव्हा आपण धातूच्या वस्तूला हात लावतो तेव्हा हा साठलेला चार्ज झटक्यात discharge होतो आणि आपल्याला शॉक बसल्यासारखं वाटतं.
मग आता प्रश्न असा की थंडीमध्ये static shock का वाढतो?
थंडीत हवा कोरडी होते, त्यामुळे सहाजिकच यात ओलावा कमी असतो. शिवाय यामुळे आपली त्वचा कोरडी होते, त्यामुळे जास्त चार्ज साचतो. यात तुम्ही स्वेटर, लोकर, सिल्कचे कपडे घातलं तर त्याचं जास्त घर्षण होतं. शिवाय तुम्ही रबर सोल असलेले शूज घातले असतील तर ते static चार्ज बाहेर पडू देत नाही.
advertisement
कार सीटकव्हर किंवा सोफ्याचे फॅब्रिक अधिक घर्षण निर्माण करतं. या सगळ्यामुळे हिवाळ्यात स्टॅटिक चार्ज सहज जमा होतो आणि discharge होताना छोटासा शॉक बसतो.
स्टॅटिक शॉक टाळण्यासाठी उपाय
1. घरातील आर्द्रता वाढवा
त्यासाठी ह्युमिडिफायर वापरा, खोलीत पाण्याचे भांडे ठेवा. हवा ओलसर राहिल्यास static discharge कमी होतो.
2. मॉइश्चरायझर वापरा
कोरडी त्वचा static electricity पटकन धरून ठेवते. हात-पाय रोज मॉइश्चरायझरने चोळा. त्यामुळे तुम्हाला शॉक लागणार नाही.
advertisement
3. धातूला हळूच स्पर्श करा
धातूच्या वस्तूला अचानक न हात लावता, आधी हळूच बोट पुढे करुन किंवा नाणी, किल्लीने स्पर्श करा, याने शॉक कमी जाणवतो.
4. कपड्यांमध्ये बदल करा
लोकर, सिल्क यांना टाळा, कॉटनचे कपडे जास्त घाला, anti-static spray वापरा
5. पायातील चप्पल बदलून पाहा
रबर सोल static charge वाढवतो. कधी कधी लेदर किंवा कापडी सोल उपयोगी ठरतो.
advertisement
हिवाळ्यात बसणारा छोटासा “शॉक” हा धोकादायक नसतो. तो फक्त static charge discharge झाल्याचा परिणाम असतो. वातावरणातील कोरडेपणा, घर्षण आणि कपड्यांचे प्रकार यामुळे तो वाढतो. घरातील आर्द्रता वाढवणे, त्वचा ओलसर ठेवणे आणि योग्य कपड्यांचा वापर केल्यास हा त्रास सहज कमी करता येतो.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 18, 2025 7:23 PM IST
मराठी बातम्या/Viral/
थंडी सुरू झाली की काही गोष्टींना हात लावताच शॉक का बसतो? यामागचं सायन्स आणि उपाय जाणून घ्या


