Video : टेंटमध्ये मित्रांसोबत झोपली होती तरुणी, सकाळी डोळे उघडताच, बाहेर जे पाहिलं त्याने थंड पडलं शरीर
- Published by:Devika Shinde
Last Updated:
ही महिला आपल्या मित्रांसोबत एका टेंटमध्ये झोपली होती, तेव्हा तिला सकाळी अचानक जाग आली तेव्हा तिने बाहेरचा नजारा फोनमध्ये टिपण्यासाठी फोन हातात घेतला
मुंबई : आजच्या सोशल मीडियाच्या दुनियेत लोक त्यांच्या प्रत्येक साहसी अनुभवाचं जगाशी शेअरिंग करतात. कधी आनंदाचे क्षण, कधी थरारक, तर कधी अंगावर काटा आणणारे दृश्य. अलीकडेच अशाच एका व्हिडिओने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडिओ एका महिलेनं शेअर केला आहे. ही महिला आपल्या मित्रांसोबत ट्रेकिंगला गेली होती आणि त्यावेळी तिने जे पाहिलं ते अंगावर काटा आणणारं होतं, ज्याचा व्हिडीओ तिने सोशल मीजियावर शेअर देखील केला आहे.
ही महिला आपल्या मित्रांसोबत एका टेंटमध्ये झोपली होती, तेव्हा तिला सकाळी अचानक जाग आली तेव्हा तिने बाहेरचा नजारा फोनमध्ये टिपण्यासाठी फोन हातात घेतला आणि व्हिडीओ सुरु केला. तेवढ्यात महिलेनं टेंटचा दरवाज्याची चैन उघडली आणि तिने जे पाहिलं ते पाहून तर तुमचे हातपाय देखील थंड पडतील.
ही महिला पर्वतारोहिणी म्हणजे मॅग्डलेना मॅज (@magdalenamadej__), ज्यांनी माउंट एव्हरेस्टसह अनेक उंच पर्वत सर केले आहेत. त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या या व्हिडिओला कॅप्शन दिलं आहे "आठवणी ज्या आजही हादरवतात… अगदी तीन वर्षांपूर्वी मी 6,600 मीटर उंचीवर जागे झाले, आणि मनासलू पर्वत (8,163 मी.) वर व्ह्यू असा होता..... त्या दिवशी आम्ही शिखर सर करण्याच्या मोहिमेला सुरुवात करणार होतो"
advertisement
हा छोटासा व्हिडिओ आज सोशल मीडियावर लाखो वेळा पाहिला गेला आहे, आणि कारणही तितकंच थरारक आहे.
काय घडलं त्या सकाळी?
हा प्रसंग नेपाळमधील मनासलू पर्वताचा (Manaslu) आहे. जगातील आठवा सर्वात उंच डोंगर, ज्याची उंची तब्बल 8,163 मीटर आहे. मॅग्डलेना आणि तिच्या टीमने या पर्वतावर चढाई सुरू केली होती. 6,600 मीटर उंचीवर त्यांनी कॅम्प उभारला आणि रात्री विश्रांती घेतली.
advertisement
पण सकाळी जेव्हा मॅग्डलेना उठली आणि टेंटची चैन उघडली तेव्हा तिच्या नजरेसमोर जे दृश्य आलं, त्याने तिचेच नव्हे तर ते पाहणाऱ्या सर्वांच्याच अंगावर काटा आणला. बाहेर जोरदार बर्फाचा वादळ, गोठलेली हवा आणि सभोवती पसरलेला पांढरा मृत शांततेचा पसारा.
व्हिडिओमध्ये दिसतं की वाऱ्याच्या झोताने टेंट हलत आहे, बर्फ उडत आहे आणि हवेत एक विचित्र थंडगार धोका जाणवतो. त्या क्षणी जर एव्हलाँच (हिमस्खलन) झालं असतं, तर ते सगळे बर्फाखाली गाडले गेले असते.
advertisement
advertisement
व्हिडिओ पाहणारे हजारो लोक थक्क झाले आहेत. अनेकांनी कमेंटमध्ये लिहिलं — “हा फक्त एक व्हिडिओ नाही, हा मृत्यूच्या दारातून परत येण्याचा अनुभव आहे.”
तर काहींनी मॅग्डलेनाचं धैर्य आणि तिच्या शांततेचं कौतुक केलं. अनेक पर्वतप्रेमींसाठी हा व्हिडिओ प्रेरणादायी ठरला आहे. कारण यात भीती, साहस आणि जिद्दीचा अनोखा संगम आहे.
advertisement
मॅग्डलेनाने सांगितलं की, त्या दिवशी त्यांनी शिखराकडे जाण्याची तयारी केली होती, पण निसर्गाने दाखवलेलं दृश्य तिच्या आयुष्यात कायमचं कोरलं गेलं. तिच्या मते, “प्रत्येक पर्वत चढाई फक्त शिखर जिंकण्याची नसते, काही वेळा ती आपल्या मर्यादा ओळखण्याची असते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 26, 2025 3:13 PM IST
मराठी बातम्या/Viral/
Video : टेंटमध्ये मित्रांसोबत झोपली होती तरुणी, सकाळी डोळे उघडताच, बाहेर जे पाहिलं त्याने थंड पडलं शरीर


