Viral News : भारतात मांजरीच्या पॉटीपासून बनते कॉफी; जगभरातील लोक पितात आवडीने

Last Updated:

तुम्ही विचार करत असाल की मांजरीच्या विष्ठेपासून कॉफी कशी बनते?

कॉफीत फक्त 'ही' गोष्ट टाका आणि वजन होईल कमी
कॉफीत फक्त 'ही' गोष्ट टाका आणि वजन होईल कमी
नवी दिल्ली : बरेच लोक कॉफीचे शौकीन आहेत. कॉफी वेगवेगळ्या प्रकारची मिळते. पण मांजरीच्या पॉटीपासून कॉफी बनवली जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? जगभरातील लोक ही कॉफी आवडीने पितात.  जगातील सर्वात महाग कॉफी म्हणून ही कॉफी ओळखली जाते.
कोपी लुवाक असं या कॉफीचे नाव आहे. या कॉफीला सिव्हेट कॉफी असंह  म्हणतात.  आशियाई देशांसह दक्षिण भारतात याचं उत्पादन केलं जातं. भारतात या कॉफीचे उत्पादन कर्नाटकातील कुर्ग जिल्ह्यात होते. इंडोनेशियामध्ये आशियातील सर्वाधिक कॉफीचे उत्पादन होते
खास मांजरीची विष्ठा वापरली जाते
ज्या मांजरीच्या विष्ठेपासून ही कॉफी तयार केली जाते. त्या मांजराची प्रजाती अत्यंत दुर्मिळ आहे. सिव्हेट ही मांजर. या मांजरीची शेपटी माकडाच्या शेपटीसारखी लांब असते. ही मांजर इकोसिस्टम राखण्यात महत्त्वाचं योगदान देते.
advertisement
मांजरीच्या विष्ठेपासून कॉफी कशी बनते?
सिव्हेट मांजरींना कॉफी बीन्स खायला आवडते. ती फक्त अर्धी कॉफी चेरी खाते. मांजरी चेरी पूर्णपणे पचवू शकत नाहीत कारण त्यांच्या आतड्यांमध्ये पाचक एंजाइम नसतात. अयोग्य पचनामुळे, खाल्लेले अन्न मांजरीच्या विष्ठेच्या रूपात बाहेर येते. न पचलेले कॉफी बीन्स स्टूलमधून काढून स्वच्छ केले जातात. बीन्स धुऊन ग्राउंड केले जातात आणि कॉफी तयार आहे.
advertisement
लोकांना ही कॉफी का आवडते?
कॉफी थेट बनवता येते. पण जेव्हा ही कॉफी मांजरांच्या आतड्यांमधून जाते, तेव्हा ते पाचक एन्झाईम्ससोबत मिसळून कॉफी आणखी चांगली आणि पौष्टिक बनवतात. नॅशनल जिओग्राफिकच्या अहवालात असे म्हटले आहे की कॉफी बीन्स मांजरीच्या आतड्यातून गेल्यानंतर बीन्समधील प्रथिनांची रचना बदलते. ही कॉफी आम्लपित्त देखील दूर करते.
किंमत किती?
या कॉफीला सामान्य लोकांची नाही तर श्रीमंतांची कॉफी म्हणतात. त्याची किंमत 20 ते 25 हजार रुपये प्रति किलो आहे.
view comments
मराठी बातम्या/Viral/
Viral News : भारतात मांजरीच्या पॉटीपासून बनते कॉफी; जगभरातील लोक पितात आवडीने
Next Article
advertisement
Pune: भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा, सीसीटीव्ही फुटेज समोर
भीमाशंकर मंदिरात पुजाऱ्याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण, शिंदे गटाच्या नेत्याचा राडा
  • बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्रीक्षेत्र भीमाशंकर मंदिरात मारहाणीचा प्रका

  • शिंदे गटाचे पुणे उत्तर जिल्हाप्रमुख देवदास दरेकर यांनी पुजाऱ्याला मारहाण केली.

  • कोणतीही पोलीस तक्रार दाखल झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement