1435 फुटांच्या उंचीवर चढला तरुण, धडकी भरवणारा स्टंट; VIDEO VIRAl
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
उंचीची भीती अनेकांना असते. खरं तर बहुसंख्य लोकांना असते असं म्हटलं तरी त्यात चुकीचं काही नाही. उंचावरुन खाली बघायचं तर आपल्यापैकी अनेकांना भीती वाटते.
नवी दिल्ली : उंचीची भीती अनेकांना असते. खरं तर बहुसंख्य लोकांना असते असं म्हटलं तरी त्यात चुकीचं काही नाही. उंचावरुन खाली बघायचं तर आपल्यापैकी अनेकांना भीती वाटते. अशात कुणी तरी उंच इमारती, लाइट हाउस किंवा टॅावरवर झरझर चढून जात असेल तर त्याला यशस्वी चढाई मानण्यात काहीही गैर नाही. लोकांना असलेल्या उंचीच्या भयामुळेच बुर्ज खलिफासारख्या इमारतीवर केलेली चढाई ही लगेच बातम्यांचा विषय ठरते. त्यांवर जाऊन फोटो काढणं हे एखाद्या भयानक स्टंटपेक्षा कमी नसतं. खूप लोकांना असे विचित्र छंद असतात. नुकताच एका तरुणाच्या अशाच विचित्र छंदाचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओतील तरुण अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरातील एम्पायर स्टेट या इमारतीच्या टेरेसवरील ॲंटेनाच्या टोकावर उभा राहात असल्याचं दिसत आहे. उंचीचा धसका असलेल्या कित्येकांना त्या इमारतीच्या टेरेसवरुन साधं खाली वाकून बघणंही जमणार नाही, तिथे हा तरुण मात्र त्यावरील ॲंटीनावर उभा राहात आहे.
advertisement
1435 फुटांच्या उंचीवरुन केलेला हा स्टंट म्हणजे एक रेकॉर्डच असतं आणि ते करणं हे कुणा सामान्य माणसाचं काम नसतं, हे तर स्पष्टच आहे. व्हिडिओतील तरुण हेलीकॉप्टरला जोडलेल्या एका दोरखंडाला धरुन ॲंटेनावर उभा आहे. हा दोरखंड अर्थातच व्हिडिओमध्ये दिसत नाही. तो कुठे उभा आहे ते त्याने स्वतःच कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. तो उभं राहाण्याच्या निर्धारित ठिकाणी पोहोचताच हेलीकॉप्टर त्याच्या बाजूने थेट त्याच्या डोक्यावर येऊन पोहोचताना व्हिडिओत दिसत आहे.
advertisement
हे दृश्य बघणं अक्षरशः धडकी भरवणारं आहे. हेलीकॉप्टरमधील कॅमेरा त्याच्या उंचीवरुन या तरुणाकडे बघतो तेव्हा आजूबाजूच्या इतर इमारतींची फक्त चौकोनी आकाराचीडोकी दिसतात. तरुणाने हेलीकॉप्टरमधून आलेला एक दोरखंड धरुन राहातो. livejn नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत 2 कोटी 11 लाख लोकांनी तो पाहिला आहे.
advertisement
अनेक लोकांनी या व्हिडिओवर कॉमेंट्स करताना व्हिडिओ बघूव वाटलेली भिती व्यक्त केली आहे. व्हिडिओ बघताना भितीने हातपाय थंड पडल्याचं एका युझरने म्हटलं आहे. अनेकांनी या तरुणाचं कौतुक केलं आहे. ‘हे सगळं का करायचं?’ असं एका युझरने विचारलं आहे. तर दुसऱ्या युझरने ‘हा स्टंट करताना भूकंप झाला तर?’ असं विचारुन लोकांच्या भितीत भर घातली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 30, 2024 3:11 PM IST