गुड न्यूज! सोयाबीनच्या दरात मोठी उलथापालथ, कोणत्या जातीला किती मिळतोय भाव?
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Soybean Market : राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मंगळवारी (२८ ऑक्टोबर) रोजी सोयाबीनची एकूण आवक तब्बल १ लाख १९ हजार १० क्विंटल इतकी झाली आहे.
मुंबई : राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये मंगळवारी (२८ ऑक्टोबर) रोजी सोयाबीनची एकूण आवक तब्बल १ लाख १९ हजार १० क्विंटल इतकी झाली आहे. दिवाळीनंतर बाजार पुन्हा एकदा गती पकडताना दिसत आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत सोयाबीनचे दर स्थिरावले असून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये नवचैतन्य दिसत आहे.
राज्यातील सरासरी भाव आज ४ हजार ते ४ हजार ३०० रुपये प्रति क्विंटल इतके राहिले. काही ठिकाणी गुणवत्तेनुसार दर ४ हजार ५०० रुपयांपर्यंत गेले. विशेष म्हणजे, चिखली बाजारात उत्कृष्ट प्रतीच्या सोयाबीनला तब्बल ५ हजार रुपयांचा उच्चांक मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
२८ ऑक्टोबर रोजीचे दर
किमान दर - ३,००० रुपये प्रति क्विंटल (दर्यापूर, देवळगाव राजा, काटोल आदी बाजारात)
advertisement
कमाल दर - ५,००० रुपये प्रति क्विंटल (चिखली बाजार समिती)
सर्वसाधारण दर - ४,०४६ रुपये प्रति क्विंटल
दिवाळीनंतर बाजार पुन्हा स्थिर झाल्याने व्यापाऱ्यांनी खरेदीचा वेग वाढवला आहे. अनेक ठिकाणी बाजारात सोयाबीनची मोठ्या प्रमाणावर आवक होत असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
‘पिवळ्या सोयाबीन’ ला वाढती मागणी
मराठवाडा आणि विदर्भातील सर्व प्रमुख बाजारात ‘पिवळा सोयाबीन’ या जातीला सर्वाधिक मागणी आहे. या जातीचे दाणे वजनदार आणि तेलाचे प्रमाण जास्त असल्याने व्यापाऱ्यांना ते अधिक पसंत आहेत. लातूर, अकोला, चिखली, मेहकर, नायगाव आणि तुळजापूर या बाजारांमध्ये या जातीच्या सोयाबीनला ४,२०० ते ४,५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहेत.
advertisement
चिखली येथे मात्र दर्जेदार सोयाबीनच्या भावाने ५,००० रुपयांचा उच्चांक गाठला, ज्यामुळे त्या बाजारात मोठी उलाढाल झाली. व्यापाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गुणवत्तेनुसार दर आणखी वाढू शकतात.
व्यापाऱ्यांचा अंदाज आणि शेतकऱ्यांची अपेक्षा
तज्ञांच्या मते, सध्या देशांतर्गत बाजारात तेलबियांच्या मागणीत वाढ होत असल्याने दर काही प्रमाणात स्थिर राहतील. मात्र, पुढील काळात निर्यात वाढल्यास दर आणखी सुधारण्याची शक्यता आहे.
advertisement
एकूणच, दिवाळीनंतर बाजारात स्थैर्य येत असून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. गुणवत्तेनुसार दरांमध्ये वाढ होत असल्याने पुढील काही दिवस राज्यातील सोयाबीन बाजार अधिक जोमात राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 29, 2025 10:18 AM IST


