सोयाबीनच्या आवकेसह दरातही वाढ! कुठे किती मिळाला भाव? आजचे मार्केट काय?

Last Updated:

Soyabean Bajar Bhav : राज्यात सोयाबीनच्या बाजारभावात सध्या चढ-उताराचे चित्र पाहायला मिळत आहे. विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये झालेल्या आवक आणि गुणवत्तेनुसार दरामध्ये फरक दिसून येत आहे.

soybean market
soybean market
मुंबई : राज्यात सोयाबीनच्या बाजारभावात सध्या चढ-उताराचे चित्र पाहायला मिळत आहे. विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये झालेल्या आवक आणि गुणवत्तेनुसार दरामध्ये फरक दिसून येत आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळत असला तरी काही बाजारांत दर दबावाखाली असल्याचे चित्र आहे. 6 आणि 7 डिसेंबर 2025 रोजी राज्यातील सोयाबीनचा सर्वसाधारण बाजारभाव साधारण 3,200 ते 4,500 रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान फिरताना दिसत आहे.
advertisement
छ. संभाजीनगर विभागात सोयाबीनच्या दरात संमिश्र स्थिती आहे. पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीत 7 डिसेंबर रोजी अत्यल्प आवक झाली असून पिवळ्या सोयाबीनला 4,146 रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. याच बाजारात 6 डिसेंबर रोजी झालेल्या व्यवहारात सोयाबीनला 4,531 रुपये असा उच्च दर नोंदवण्यात आला. छत्रपती संभाजीनगर बाजार समितीत आवक कमी असली तरी सोयाबीनला थेट 4,350 रुपयांचा भाव मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
advertisement
विदर्भात आवक वाढली
विदर्भात मोठ्या प्रमाणावर सोयाबीनची आवक झाली आहे. कारंजा बाजार समितीत तब्बल 5,000 क्विंटलची आवक झाली असून येथे किमान 4,090 ते कमाल 4,485 रुपये, तर सरासरी 4,275 रुपये दर मिळाला. अमरावती बाजारात 5,082 क्विंटलची आवक असून सर्वसाधारण भाव 4,250 रुपये राहिला. नागपूर, हिंगोली, उमरेड आणि मुर्तीजापूर या बाजारांतही 4,100 ते 4,300 रुपयांच्या आसपास दर टिकून आहेत. मात्र चंद्रपूर जिल्ह्यातील काही बाजारांत दर घसरले असून किमान भाव 3,450 रुपयांपर्यंत खाली आला आहे.
advertisement
मराठवाड्यात मिळाला सर्वाधिक भाव
मराठवाड्यातील बाजारांतही चित्र वेगळे आहे. जालना बाजार समितीत 5,360 क्विंटल इतकी मोठी आवक झाली. येथे सोयाबीनचा कमाल दर 5,200 रुपये इतका उच्चांक गाठताना दिसला, तर सर्वसाधारण दर 4,425 रुपये राहिला. हिंगणघाट, आर्वी आणि वरोरा परिसरात मात्र कमी प्रतीच्या मालामुळे 2,500 ते 3,600 रुपयांपर्यंत व्यवहार झाल्याची नोंद आहे. यामुळे या भागातील शेतकऱ्यांची काहीशी निराशा झाली आहे.
advertisement
उत्तर महाराष्ट्रातील लासलगाव-निफाड बाजारात पांढऱ्या सोयाबीनला चांगला प्रतिसाद मिळाला असून सर्वसाधारण दर 4,470 रुपये राहिला. मालेगाव, पालम, मुखेड आणि उमरखेड या बाजारांतही 4,400 ते 4,500 रुपयांच्या आसपास दर मिळाल्याने दर्जेदार सोयाबीनला सध्या चांगला भाव मिळत आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
सोयाबीनच्या आवकेसह दरातही वाढ! कुठे किती मिळाला भाव? आजचे मार्केट काय?
Next Article
advertisement
Uddhav Thackeray: कामगार संघटना वादामुळे ठाकरे गट-भाजपात राडा, उद्धव अ‍ॅक्शन मोडवर, मातोश्रीवर मोठी घडामोड
ठाकरे गट-भाजपात राडा, उद्धव अ‍ॅक्शन मोडवर, मातोश्रीवर मोठी घडामोड
  • ठाकरे गट-भाजपात राडा, उद्धव अ‍ॅक्शन मोडवर, मातोश्रीवर मोठी घडामोड

  • ठाकरे गट-भाजपात राडा, उद्धव अ‍ॅक्शन मोडवर, मातोश्रीवर मोठी घडामोड

  • ठाकरे गट-भाजपात राडा, उद्धव अ‍ॅक्शन मोडवर, मातोश्रीवर मोठी घडामोड

View All
advertisement