Jambhul Farming: ना पाण्याचं टेन्शन, ना खर्चाची चिंता, शेतकऱ्यानं लावली 100 झाडं, वर्षाची कमाई 4 लाख!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Jambhul Farming: सध्या मराठवाड्यातील काही शेतकरी फळ बागांची शेती करून लाखोंची कमाई करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील शेतकऱ्याने जांभूळ शेतीतून 4 लाखांचे उत्पन्न घेतले.
छत्रपती संभाजीनगर : सध्या मराठवाड्यातील शेतकरी पारंपरिक शेतीसोबतच आपल्या शेतात नवनवे प्रयोग देखील करत आहेत. काहीजण फळबागांच्या शेतीतून बक्कळ कमाई करत आहेत. छत्रपती संभाजीनगरमधील एका शेतकऱ्याने जांभूळ शेती केलीये. एक एकर जांभूळ शेतीतून रंजना आणि अशोक डोईफोडे दाम्पत्य लाखोंची कमाई करत आहेत. याचबाबत लोकल18 च्या माध्यमातून जाणून घेऊ.
रंजना आणि अशोक डोईफोडे हे पैठण तालुक्यातील पाचोरा गावचे शेतकरी दाम्पत्य आहे. त्यांनी आपल्या एक एकर शेतात जांभळाची शेती करण्याचा निर्णय घेतला आणि सहा वर्षांपूर्वी 100 झाडांची लागवड केली. तीन वर्षांत जांभळाचे फळ विक्रीसाठी उपलब्ध झाले. जांभळाला बाजारात चांगला भाव असून अत्यंत कमी खर्चात त्यांना लाखोंची कमाई होत आहे.
advertisement
सध्या डोईफोडे यांच्या शेतातील एका जांभळीच्या झाडाला तब्बल एक क्विंटल पेक्षा अधिक जांभळे लागले आहेत. आज या जांभळाला 180 ते 200 रुपये प्रति किलो दर मिळत आहे. या पिकाच्या माध्यमातून चार लाखापेक्षा जास्त उत्पन्न त्यांना मिळाले आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात पारंपरिक पिकांसोबतच वेगळा पर्याय शोधला पाहिजे. जांभूळ शेती फायद्याची असून कमी खर्चात चांगली कमाई होते, असे अशोक डोईफोडे सांगतात.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
June 28, 2025 1:44 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Jambhul Farming: ना पाण्याचं टेन्शन, ना खर्चाची चिंता, शेतकऱ्यानं लावली 100 झाडं, वर्षाची कमाई 4 लाख!

