...तर शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही! PM Kisan योजनेबाबत मोठा निर्णय

Last Updated:

PM Kisan yojana : शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले असून पीएम किसान योजनेत आता नवीन अट लागू करण्यात येत आहे.

PM Kisan Yojana
PM Kisan Yojana
मुंबई : शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले असून पीएम-किसान योजनेत आता नवीन अट लागू करण्यात येत आहे. यापुढे या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला शेतकरी ओळखपत्र (Farmer ID) असणे बंधनकारक राहणार आहे. सरकारच्या मते, या निर्णयामुळे लाभार्थ्यांची अचूक ओळख पटेल आणि आर्थिक मदत थेट पात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे अधिक सोपे होईल.
advertisement
पीएम किसान योजनेत मोठा बदल
आत्तापर्यंत पीएम-किसान योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी ६ हजार रुपयांची मदत थेट बँक खात्यात जमा केली जात होती. मात्र, अनेक ठिकाणी चुकीची नोंदणी, अपूर्ण कागदपत्रे किंवा अपात्र लाभार्थ्यांमुळे अडचणी निर्माण होत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले. यावर उपाय म्हणून आता शेतकरी ओळखपत्र प्रणाली लागू करण्यात आली आहे. शेतकरी आयडी नसल्यास पीएम-किसानचा हप्ता थांबवला जाऊ शकतो, असा स्पष्ट इशाराही प्रशासनाने दिला आहे.
advertisement
शेतकरी ओळखपत्राची गरज का भासली?
सरकार शेतीशी संबंधित सर्व योजना डिजिटल व्यासपीठावर आणण्याच्या तयारीत आहे. पिक विमा, पीक कर्ज, अनुदान, खतवाटप आणि पीएम-किसान यासारख्या योजना एकाच डेटाबेसशी जोडण्याचा उद्देश आहे. यासाठी प्रत्येक शेतकऱ्याची एकमेव डिजिटल ओळख असणे अत्यंत महत्त्वाचे ठरते. शेतकरी ओळखपत्रामुळे एकाच शेतकऱ्याला अनेक ठिकाणी पुन्हा पुन्हा नोंदणी करण्याची गरज भासणार नाही.
advertisement
शेतकरी नोंदणीचे फायदे
डिजिटल शेतकरी नोंदणीमुळे अनेक फायदे मिळणार आहेत. शेतकऱ्यांपर्यंत सरकारी योजनांची माहिती थेट पोहोचेल. चुकीच्या नोंदी, दुहेरी लाभ आणि फसवणुकीला आळा बसेल. भविष्यात नवीन योजना सुरू झाल्यास पात्र शेतकऱ्यांना आपोआप लाभ मिळू शकेल. तसेच, शासनाकडे एका व्यासपीठावर अद्ययावत माहिती उपलब्ध राहणार आहे.
advertisement
शेतकऱ्यांनी काय करावे?
पीएम-किसान योजनेचा लाभ अखंडितपणे सुरू ठेवायचा असेल, तर शेतकऱ्यांनी तातडीने शेतकरी ओळखपत्रासाठी नोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी ई-केवायसी पूर्ण असणे, आधार कार्ड व बँक खाते लिंक असणे गरजेचे आहे. शेतकरी आयडी क्रमांक मिळाल्यानंतर तो सुरक्षित ठेवा, असे आवाहन करण्यात आले आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
...तर शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाही! PM Kisan योजनेबाबत मोठा निर्णय
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement