Agriculture News : स्वस्त धान्य बंद करण्याची तारीख ठरली! 'या' लाभार्थ्यांना मिळणार नाही लाभ,निर्णय काय झाला? वाचा सविस्तर

Last Updated:

Ration Card : राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने कडक सूचना दिल्या आहेत की, रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक नसल्यास स्वस्त धान्याचा लाभ बंद केला जाईल. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 98.79% लाभार्थ्यांचे आधार सीडिंग पूर्ण झाले आहे, मात्र अजूनही 22,050 लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.त्यामुळे मार्च-एप्रिलपासून त्यांच्या धान्य वितरणावर निर्बंध येणार आहेत.

News18
News18
लातूर : राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने कडक सूचना दिल्या आहेत की, रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक नसल्यास स्वस्त धान्याचा लाभ बंद केला जाईल. लातूर जिल्ह्यात आतापर्यंत 98.79% लाभार्थ्यांचे आधार सीडिंग पूर्ण झाले आहे, मात्र अजूनही 22,050 लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही.त्यामुळे मार्च-एप्रिलपासून त्यांच्या धान्य वितरणावर निर्बंध येणार आहेत.
जिल्ह्यातील स्वस्त धान्य योजनेचा आढावा
लातूर जिल्ह्यात प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजनेंतर्गत एकूण 3.98 लाख लाभार्थ्यांना दरमहा मोफत धान्य वितरित केले जाते. प्रत्येक लाभार्थ्यास दरमहा 2 किलो तांदूळ आणि 3 किलो गहू दिला जातो.18.22 लाख लोकसंख्येला या योजनेचा फायदा मिळतो.
आधार सीडिंगमध्ये निलंगा तालुका आघाडीवर
जिल्ह्यात आधार सीडिंग प्रक्रियेचे काम वेगाने सुरू असून, निलंगा तालुक्यात 100% आधार सीडिंग पूर्ण झाले आहे. तालुक्यातील 2.41 लाख लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली आहे.मात्र,जळकोट आणि देवणी तालुके अद्याप पिछाडीवर आहेत.
advertisement
लाभार्थ्यांसाठी सुविधा आणि अंतिम मुदत
लातूर जिल्ह्यात 1,351 स्वस्त धान्य दुकाने आहेत, जिथे आधार सीडिंग आणि ई-केवायसी करण्याची सोय उपलब्ध आहे.सरकारने स्पष्ट निर्देश दिले आहेत की, 28 फेब्रुवारीपर्यंत उर्वरित लाभार्थ्यांनी आधार लिंक करणे बंधनकारक आहे. जर त्या तारखेपर्यंत प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर धान्य पुरवठा थांबवण्यात येईल.
जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांचा इशारा
जिल्हा पुरवठा अधिकारी व्यंकटेश रावलोड यांनी सांगितले की, "शासन आदेशानुसार स्वस्त धान्याचा लाभ घेण्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी आधार सीडिंग आणि ई-केवायसी करणे आवश्यक आहे. 28 फेब्रुवारीपर्यंत प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित लाभार्थ्यांचा धान्य पुरवठा थांबवला जाईल. वारंवार सूचना देऊनही 22,050 लाभार्थ्यांनी अद्याप आधार लिंक केलेले नाही,त्यामुळे कठोर पावले उचलण्यात येतील."
advertisement
दरम्यान, जे लाभार्थी अद्याप आधार लिंकिंग किंवा ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही, त्यांनी लवकरात लवकर जवळच्या स्वस्त धान्य दुकानात जाऊन ही प्रक्रिया पूर्ण करावी. अन्यथा, मार्च महिन्यापासून त्यांना धान्य मिळणे कठीण होईल.
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : स्वस्त धान्य बंद करण्याची तारीख ठरली! 'या' लाभार्थ्यांना मिळणार नाही लाभ,निर्णय काय झाला? वाचा सविस्तर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement