शेतकऱ्यानं करुन दाखवलं! कोकणात नव्हे तर मराठवाड्यातील याठिकाणी घेतलं इंद्रायणी तांदळाचं उत्पादन
- Published by:Mohan Najan
- Reported by:Abasaheb Dharmraj Sabale
Last Updated:
पुणे आणि कोकण अशा अति पर्जन्यमान असलेल्या परिसरात इंद्रायणी तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. परंतु दुष्काळी मराठवाड्यातल्या धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात बालाघाट डोंगर रांगांच्या कुशीत इंद्रायणी तांदळाचे उत्पादन घेण्यात आलंय.
उदय साबळे, प्रतिनिधी
धाराशिव : पुणे आणि कोकण अशा अति पर्जन्यमान असलेल्या परिसरात इंद्रायणी तांदळाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. खरंतर जास्त पाऊस असलेल्या परिसरात तांदळाचे उत्पादन घेतले जाते. परंतु दुष्काळी मराठवाड्यातल्या धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यात बालाघाट डोंगर रांगांच्या कुशीत इंद्रायणी तांदळाचे उत्पादन घेण्यात आलंय.
भूम तालुक्यातील वंजारवाडी येथील शिवाजी खांडेकर या शेतकऱ्याने आपल्या शेतात नवीन प्रयोग केलाय. भूम तालुक्यात आत्तापर्यंत पारंपारिक पिकांचे उत्पादन घेतलं जातं तर सोयाबीन, ज्वारी, उडीद, मका ही पिकं घेतल्या जाणाऱ्या प्रदेशात खांडेकर यांनी इंद्रायणी तांदळाची लागवड केली आहे आणि हे पीक सध्या काढणीच्या अवस्थेत आहे.
advertisement
खांडेकर यांचे एक एकर चिबड क्षेत्र आहे. त्यातून पावसाळ्यात काहीच हाती लागत नाही. म्हणून खांडेकर यांनी इंद्रायणी तांदळाची लागवड केली. आता हे पीक काढण्याच्या अवस्थेत आले आहे तरी यातून चांगले उत्पन्न होण्याची अपेक्षा खांडेकर यांनी व्यक्त केली आहे. खरंतर पुणे आणि मावळ परिसरात पिकणारा हा तांदूळ आता धाराशिवच्या भूम तालुक्यात पिकलाय.
advertisement
शेतकरी शेती करताना नवनवीन प्रयोग करतायत खांडेकर यांच्या शेतात जास्त पाऊस पडल्यास शेत चिबडते. शेतात एक ते दीड महिन्यापर्यंत पाणी साचून राहते. त्यामुळे या शेतात कोणतेच उत्पन्न घेता येत नाही. त्यामुळे खांडेकर यांनी हात नवीन प्रयोग केला कमी पर्जन्यमान असलेल्या आणि दुष्काळी असलेल्या भूम तालुक्यातील वंजारवाडी येथे त्यांनी इंद्रायणी तांदुळाचे उत्पादन घेतले आहे.
advertisement
तांदळाचे पीक सध्या काढणीच्या अवस्थेत असून त्यातून त्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा तर या तांदळाची बुकिंग झाल्याचे खांडेकर यांनी बोलताना सांगितले. ज्या शेतीतून एक रुपयाचे उत्पन्न मिळू शकत नव्हतं त्या ठिकाणी त्यांनी नवीन प्रयोग केल्याने त्यांना चांगले उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
view commentsLocation :
Osmanabad,Maharashtra
First Published :
October 29, 2024 7:07 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यानं करुन दाखवलं! कोकणात नव्हे तर मराठवाड्यातील याठिकाणी घेतलं इंद्रायणी तांदळाचं उत्पादन

