ऐन दिवाळीत भाकरी महाग, बाजरी खातीय भाव, पाहा काय मिळतोय दर
- Published by:Mohan Najan
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
थंडीची चाहूल लागताच बाजरीच्या भावात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत भाकरी महाग झाली आहे.
नारायण काळे प्रतिनिधी
जालना : थंडीची चाहूल लागताच बाजरीच्या भावात सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत भाकरी महाग झाली आहे. सर्वसामान्य ग्राहकांबरोबरच ऊसतोड मजुरांकडून बाजरीला मोठी मागणी होत आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 200 ते 300 क्विंटल बाजरीची आवक होत आहे. या बाजरीला आठवडाभरापूर्वी 2000 ते 2500 रुपये प्रतिक्विंटल असा दर मिळत होता मात्र आता दरात 200 ते 250 रुपयांची सुधारणा झाल्याचे पाहायला मिळत आहे. जालना कृषी उत्पन्न बाजार समितीतील बाजरीला नाशिक, नगर आणि पुणे जिल्ह्यातूनही मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे.
advertisement
ज्वारी आणि बाजरीची भाकर आरोग्यास अतिशय उत्तम असल्याचे सांगितले जात. त्याचबरोबर पचनास हलकी असते. त्यामुळे नोकरदार वर्गामध्ये ज्वारी आणि बाजरी थंडीच्या दिवसांमध्ये खाण्याकडे कल असल्याचे पाहायला मिळतं. तर ऊसतोड मजुरांमध्ये झटपट तयार होणारी आणि आरोग्यास कोणताही अपाय न करणारी असल्याने बाजरीकडे कल असतो. कमी साहित्यात आणि लवकर तयार होत असल्याने कामाला लवकर लागता येते. यामुळे या दोन वर्गाकडून बाजरीला मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे. त्याचबरोबर बाहेर जिल्ह्यात देखील बाजरीला मोठी मागणी आहे. त्यामुळे 2200 ते 2800 रुपयांपर्यंत दर बाजरीला मिळत असल्याचे व्यापारी संजय कानडे यांनी सांगितलं.
advertisement
सध्या बाजारात रब्बी हंगामातील बाजरी येत आहे. खरीप हंगामातील बाजरीला पावसामुळे दर्जा खराब झाल्याने कमी दर मिळत आहे. मात्र उत्तम क्वालिटीची रब्बी हंगामातील बाजरी 2200 रुपयांपासून साडे सत्तावीसशे ते 2800 रुपयांपर्यंत विक्री होत असल्यास देखील व्यापाऱ्यांनी सांगितलं. आगामी काळामध्ये मागणीत वाढ होणार असून यामुळे दर तेजितच राहतील, असं व्यापारी संजय कानडे यांनी सांगितलं. तर भविष्यात बाजरीचे दर हे 3000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत ही जाऊ शकतात.
advertisement
जालना मोंढ्यामध्ये बाजरीची चांगली आहोत होत आहे. थंडीची चाहूल लागल्याने बाजरीच्या भावात 200 ते 250 रुपयांची वाढ झाली आहे. कमी गुणवत्तेच्या बाजरीला 2200 ते 2500 रुपये तर उत्तम गुणवत्तेच्या बाजरीला 2500 ते 2800 रुपयांपर्यंत दर मिळत असल्याचं व्यापारी संजय कानडे यांनी सांगितलं.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
October 29, 2024 2:00 PM IST