Success Story : शेळीपालनातून 6 लाखांचा नफा! असं आहे बीडमधील तरुण शेतकऱ्याचं आर्थिक यशाचे मॉडेल

Last Updated:

बीड़ जिल्ह्यातील हनुमान सुलक्षने यांनी शेळीपालनातून ५-६ लाखांचा वार्षिक नफा मिळवला आहे, अल्प भूधारक असताना देखील प्रगतीचे एक नवे मॉडेल त्यांनी निर्माण केले आहे.

+
शेळीपालन

शेळीपालन व्यवसायाने युवकाला केलं मालामाल

प्रशांत पवार-प्रतिनीधी, बीड : शेतीत नवनवीन प्रयोग होत असताना, अनेक शेतकरी पारंपारिक पिकांवर अवलंबून न राहता जोडधंद्याच्या शोधात आहेत. अशाच एक प्रयत्नशील शेतकरी हनुमान सुलक्षने यांनी शेळीपालन करून मोठं आर्थिक यश मिळवलं आहे. बीड जिल्ह्यातील या युवकाकडे फक्त २० गुंठे जमिन होती, त्यामुळे फक्त पारंपरिक पिकांवर अवलंबून राहून उत्पन्न वाढवणे त्यांना शक्य नव्हते. म्हणूनच त्यांनी शेळीपालनाला सुरुवात केली आणि आता या व्यवसायातून वर्षाला पाच ते सहा लाखांचा नफा मिळवत आहेत.
हनुमान सुलक्षने यांनी वयाच्या १८ व्या वर्षी दोन शेळ्यांनी व्यवसायाला सुरुवात केली. घरची परिस्थिती साधारण असल्याने त्यांना सुरुवातीला मोलमजुरी करत शेळ्यांची देखभाल करावी लागली. त्यानंतर, शेळ्यांचे आरोग्य, प्रजनन आणि चारा व्यवस्थापन शिकून घेतल्यावर हनुमान यांनी शेळ्यांसाठी शेड बांधले. ही सुविधा उभारण्यासाठी आवश्यक भांडवल व्याजाने घेऊन त्यांचा व्यवसाय उभा राहिला. सुरुवातीला व्यवसाय संथ गतीने चालला, परंतु हळूहळू ग्राहकांचा प्रतिसाद वाढू लागला आणि शेळीपालनाला चांगला नफा मिळू लागला.
advertisement
उच्च उत्पादनक्षम शेळ्यांचा वापर: हनुमान यांना त्यांच्या व्यवसायात प्रजननक्षम आणि निरोगी शेळ्यांचा वापर करून नफा मिळवता आला. मांस आणि दूध उत्पादनासाठी उच्च दर्जाच्या शेळ्या आणि बोकड निवडल्याने त्यांना दरवर्षी वाढलेले उत्पन्न मिळू लागले. यामुळेच त्यांनी कमी वेळात मोठा नफा मिळवला.
प्रजनन व्यवस्थापन आणि खर्च कमी करणे: मांस उत्पादनासाठी तीन ते चार महिने वयाचा बोकड विकत घेऊन त्याची जोपासना करून विक्री केल्याने खर्च आणि जोखीम कमी होते. उच्च उत्पादनक्षम बोकड नसल्याने सामान्यतः प्रजनन व्यवस्थापनात अडचणी येतात, मात्र योग्य व्यवस्थापनाच्या साहाय्याने हे आव्हान सोडवता येते. वेळोवेळी चारा उपलब्ध करून देणे आणि शेळ्यांची काळजी घेणे हे त्यांनी काटेकोरपणे केले.
advertisement
हनुमान सुलक्षने यांचा शेळीपालनाचा व्यवसाय आता उत्तम नफा मिळवत असून, यशाची एक प्रेरणादायक कहाणी बनली आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Success Story : शेळीपालनातून 6 लाखांचा नफा! असं आहे बीडमधील तरुण शेतकऱ्याचं आर्थिक यशाचे मॉडेल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement