पुण्यातील नोकरी सोडून गावी आला! You Tube च्या व्हिडिओनं बदललं आयुष्य, या शेतीतून दिवसाला कमवतोय 15 हजार रुपये
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : मोठं स्वप्नं आणि त्याला जोड हिम्मत असेल तर प्रत्येक अडथळा यशाच्या पायरीत बदलतो. अशाच एका छोट्या गावातून आलेल्या तरुणाने जिद्दीने सिद्ध करून दाखवलं आहे.
मुंबई : मोठं स्वप्नं आणि त्याला जोड हिम्मत असेल तर प्रत्येक अडथळा यशाच्या पायरीत बदलतो. अशाच एका छोट्या गावातून आलेल्या तरुणाने जिद्दीने सिद्ध करून दाखवलं आहे. शहरात लाखो रुपयांची नोकरी, हातात अभियांत्रिकीची पदवी, आणि पुढे उज्वल करिअर तरीही त्याने गावाकडची वाट धरली. आणि आपले स्वप्न पूर्ण केले. चला तर मग जाणून घेऊ त्याची यशोगाथा
advertisement
इंजिनिअर ते यशस्वी शेतकरी
तरुणाचे नाव उदय कुमार असून तो झारखंडच्या चतरा जिल्ह्यातील अंबतांडा गावातील रहिवासी. बालपणापासून अभ्यासात हुशार असलेला उदय इंजिनिअर होऊन कुटुंबाची परिस्थिती सुधारेल अशी सर्वांची अपेक्षा होती. त्याने पॉलिटेक्निक व बी.टेक पूर्ण केले आणि पुण्यातील एका सुप्रसिद्ध कंपनीत इलेक्ट्रिकल इंजिनिअर म्हणून चांगल्या पगाराची नोकरी मिळवली. पण सहा महिन्यांतच त्याला जाणवलं की नोकरी करून आयुष्य बदलणार नाही. काहीतरी वेगळं निर्माण केल्याशिवाय मोठा फरक पडणार नाही.
advertisement
शहरात राहून मन गावात अडकलेलं. विचार पक्का झाला आणि उदयने नोकरी सोडून परत गावी येण्याचा निर्णय घेतला. काहींना हा निर्णय वेडा वाटला; पण उदयला आपला मार्ग ठाऊक होता.
YouTube झाला गुरू, तंत्रज्ञान बनलं शस्त्र
गावी परतल्यावर त्याने शेती वैज्ञानिक पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला. YouTube व्हिडिओ, कृषी विज्ञान केंद्र (KVK) तज्ञांची मदत आणि आधुनिक तंत्रज्ञान ही त्याची तीन मुख्य हत्यारे बनली. ठिबक सिंचन, मल्चिंग, उत्तम दर्जाची बियाणे, आंतरपीक पद्धत ही सर्व तंत्रे शिकून त्याने शेतीचे संपूर्ण रूपच बदलून टाकले. पहिल्याच वर्षी जवळपास 1 लाखांचे नुकसान झाले. गावकऱ्यांनी टीका केली, पण उदय मागे हटला नाही. त्याने अपयशाला धडा बनवला.
advertisement
सरकारी योजनांचा लाभ
उदयने प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत ठिबक सिंचनासाठी 90% अनुदान मिळवले. 1–1.5 लाखांच्या व्यवस्थेत त्याचा स्वतःचा खर्च फक्त 10–15 हजार रुपये झाला. त्याने 3 एकरवर मिरचीची लागवड केली. मेहनत, नियोजन आणि तंत्रज्ञान यामुळे त्याचे शेत हिरव्या सोन्याने भरून गेले. अवघ्या चार वर्षांत उदयने 21 टन मिरच्या विकल्या आणि 10 लाखांहून अधिक कमाई केली.
advertisement
आज तो दररोज 10,000 ते 15,000 रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवतो. मिरचीसोबतच आता 6 एकरवर टोमॅटो, 3 एकरवर वाटाणे आणि 1 एकरवर कोबीची शेतीही करतो.
तरुणांसाठी प्रेरणा
कृषी अधिकारी सांगतात, “उदयने आधुनिक तंत्रज्ञान आणि सरकारी योजनांचा योग्य वापर करून शेती नफ्यात असल्याचे सिद्ध केले आहे.” पुढील वर्षी त्याचे वार्षिक उत्पन्न 20–25 लाखांपर्यंत जाईल. तसेच उदयने इतर युवा शेतकऱ्यांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 11, 2025 7:26 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
पुण्यातील नोकरी सोडून गावी आला! You Tube च्या व्हिडिओनं बदललं आयुष्य, या शेतीतून दिवसाला कमवतोय 15 हजार रुपये









