शेतकऱ्यांनी महाविस्तार एआय अॅपचा वापर कसा करायचा? A TO Z माहिती

Last Updated:

Agriculture News : शेती अधिक आधुनिक, सुटसुटीत आणि वैज्ञानिक पद्धतीने व्हावी यासाठी राज्य कृषी विभागाने काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे.

Agriculture News
Agriculture News
मुंबई : शेती अधिक आधुनिक, सुटसुटीत आणि वैज्ञानिक पद्धतीने व्हावी यासाठी राज्य कृषी विभागाने काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला आहे.
पेरणीपासून काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावे यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित “महाविस्तार एआय अॅप” सुरू करण्यात आले आहे. या अॅपच्या मदतीने शेतकऱ्यांना आता घरबसल्या, फक्त एका क्लिकवर संपूर्ण शेतीविषयक माहिती उपलब्ध होणार आहे.
advertisement
शेतीची प्रत्येक माहिती एकाच ठिकाणी
महाविस्तार अॅपमध्ये आधुनिक शेतीसाठी आवश्यक असलेली सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामध्ये हवामानाचा दैनिक आणि साप्ताहिक अंदाज, पिकनिहाय सल्ला, खतांच्या योग्य प्रमाणाचा अंदाज, कीड आणि रोगांची ओळख व उपाययोजना, बाजारभावाची अद्ययावत माहिती
राज्य व केंद्र सरकारच्या कृषी योजनांचा तपशील
advertisement
या सर्व सुविधा एकाच प्लॅटफॉर्मवर उपलब्ध करून दिल्याने शेतकऱ्यांची धावपळ कमी होईल आणि निर्णय प्रक्रिया अधिक वेगवान व वैज्ञानिक होणार आहे.
एआय तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांसाठी त्वरित मदत
आजच्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) प्रत्येक क्षेत्रात वापरली जात आहे. कृषी विभागाने या तंत्रज्ञानाचा योग्य वापर करून शेतकऱ्यांसाठी विशेष सहाय्यक तयार केल्याने हा उपक्रम राज्यात पथदर्शी ठरत आहे. अॅपमधील चॅटबॉक्स सुविधा ही त्यातील खास वैशिष्ट्य. शेतकऱ्यांना कोणताही प्रश्न पडला जसे की, फवारणी बद्दल, खतांचा वापर, पिकांच्या वाढीबद्दल किंवा रोगांबद्दल तर चॅटबॉक्समध्ये एआय त्वरित उत्तर देतो.
advertisement
वेळीच योग्य सल्ला मिळाल्यामुळे शेतातील त्रुटी कमी होतात आणि उत्पादन वाढते. त्यामुळे हे अॅप शेतकऱ्यांसाठी डिजिटल कृषी मार्गदर्शक ठरणार आहे.
नैसर्गिक आपत्तीतील नुकसान कमी करण्यास मदत
पावसाचे अनियमित स्वरूप, तापमानातील बदल, वादळे, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तींमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असते. महाविस्तार अॅपमध्ये उपलब्ध हवामान सूचना, तातडीच्या रोगनियंत्रण उपाययोजना आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला यामुळे नुकसानाचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळणार आहे. पिकाच्या वाढीच्या प्रत्येक टप्प्यात योग्य सल्ला मिळणे हे या अॅपचे सर्वात मोठे सामर्थ्य मानले जात आहे.
advertisement
अॅप कसे वापरायचे?
अॅपचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. फार्मर आयडीमध्ये खालील माहिती समाविष्ट असते जसे की,शेतकऱ्याचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर, आधार क्रमांक, बँक खाते तपशील, सातबारा उतारा, पिकांची माहिती, कर्ज व विमा योजनांच्या नोंदी
advertisement
ही सर्व माहिती एकत्र जोडल्यामुळे सल्ला अधिक अचूक, पारदर्शक आणि सुरक्षित राहतो. ज्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांना अॅपचा वापर करता येणार नाही, असे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे.
महाविस्तार अॅप कसे डाऊनलोड करायचे?
गुगल प्ले स्टोअरवर हे अॅप मोफत उपलब्ध असून साध्या पद्धतीने इन्स्टॉल करता येते. आधुनिक शेती, नियोजन, जोखिम टाळणे, उत्पन्न वाढवणे आणि योग्य सल्ला मिळवणे. या सर्व गोष्टींमध्ये हे अॅप शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/कृषी/
शेतकऱ्यांनी महाविस्तार एआय अॅपचा वापर कसा करायचा? A TO Z माहिती
Next Article
advertisement
Mahayuti : शिंदे गट–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे मोठ्या घडामोडी, महायुतीचा महापालिकेचा फॉर्म्युला ठरला
शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर
  • शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर

  • शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर

  • शिंदे–भाजपात कुरघोडीचा डाव, पण पडद्यामागे घडामोडी, महापालिकेसाठी फॉर्म्युला ठर

View All
advertisement