MahaDBT पोर्टलवर शेतकरी गटाची नोंदणी कशी केली जाते? अर्जप्रक्रिया वाचा सविस्तर
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : शेतकरी गटांना आधुनिक शेतीत मदत मिळावी, उत्पादन वाढावे आणि नवे प्रयोग करता यावेत, यासाठी राज्य सरकारने महाडीबीटी पोर्टलवरून पिक प्रात्यक्षिके या योजनेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
मुंबई : शेतकरी गटांना आधुनिक शेतीत मदत मिळावी, उत्पादन वाढावे आणि नवे प्रयोग करता यावेत, यासाठी राज्य सरकारने महाडीबीटी पोर्टलवरून पिक प्रात्यक्षिके या योजनेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज सादर करण्यापासून ते मंजुरीपर्यंत काही महत्त्वाचे टप्पे पार करावे लागतात. शेतकरी गटांना अर्ज करताना कोणत्या प्रक्रियेचे पालन करावे लागेल? आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? याबद्दलची सविस्तर माहिती खाली दिली आहे.
नोंदणी आणि लॉगिन
महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करण्यासाठी गटाने प्रथम आपली नोंदणी करणे गरजेचे असते. यासाठी दोन पर्याय दिलेले आहेत. जसे की, ‘विद्यमान शेतकरी गट’ व ‘नवीन शेतकरी गट’.
ज्या गटांनी 31 मार्च 2025 पूर्वी पोर्टलवर नोंदणी केली असेल, त्यांनी ‘विद्यमान शेतकरी गट’ पर्याय निवडावा आणि आपला युजरनेम, पासवर्ड वापरून लॉगिन करावे. नवीन नोंदणीसाठी गटातील कोणत्याही एका सदस्याचा फार्मर आयडी वापरून पहिल्यांदा लॉगिन करावे लागते. नोंदणीनंतर गटाचे अध्यक्ष, सचिव आणि अधिकृत सदस्य यांच्या फार्मर आयडीचे सत्यापन (व्हेरिफिकेशन) करणे अनिवार्य असते.
advertisement
अर्ज सादर करणे
नोंदणी पूर्ण झाल्यावर अधिकृत सदस्याच्या आयडीने लॉगिन करावे. त्यानंतर पिक प्रात्यक्षिक घटकासाठी अर्ज भरावा. अर्ज सादर करताना सविस्तर माहिती देणे आवश्यक असते – जसे की गटातील सदस्यांची यादी, शेताचा तपशील, लागवडीचे क्षेत्रफळ, अपेक्षित उत्पादन इत्यादी.
प्राथमिक निवड आणि माहिती भरणे
अर्ज सादर झाल्यावर ‘फर्स्ट कम फर्स्ट सर्व्ह (FCFS)’ तत्वावर अर्जदारांची प्राथमिक यादी तयार केली जाते. यादीत नाव आल्यावर गटाने पुन्हा लॉगिन करून गटातील सर्व सदस्यांची माहिती बारकाईने भरावी. ही माहिती पुढील छाननीसाठी फार महत्त्वाची ठरते.
advertisement
अर्जाची छाननी आणि अंतिम मंजुरी
तहसील कार्यालयाकडून अर्ज पोर्टलवर प्राप्त झाल्यावर तलाठी व मंडळ अधिकारी यांच्याकडून तपासणी केली जाते. या प्रक्रियेत अर्जदार गटाने दिलेली माहिती खरी आहे का, याची खातरजमा होते. यानंतर सार्वजनिक जाहीर सूचना दिली जाते, जेणेकरून कुणाला आक्षेप असेल तर तो मांडता येईल. छाननीनंतर सर्व काही व्यवस्थित आढळल्यास अर्जाला अंतिम मंजुरी दिली जाते.
advertisement
अर्ज करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या
अर्ज करताना प्रत्येक वेळी फक्त अधिकृत सदस्याचा फार्मर आयडी वापरावा लागतो.
अर्जाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठीही याच आयडीने लॉगिन करावे. पूर्वी नोंदणीकृत गटांनी आपले ‘युजरनेम व पासवर्ड’ व्यवस्थित जतन करणे गरजेचे असते. नव्याने नोंदणी करणाऱ्यांनी गटातील सदस्यांची माहिती पूर्ण व अचूक भरावी.
या प्रक्रियेमुळे शेतकरी गटांना त्यांच्या शेतावर प्रात्यक्षिके राबवण्यासाठी सरकारी सहाय्याचा लाभ सहज मिळवता येतो. पिकांची उत्पादकता वाढवणे आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणे यासाठी ही योजना उपयुक्त ठरते.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 06, 2025 2:14 PM IST


