हिवाळ्यात प्रचंड मागणी, या पिकाची लागवड करून फक्त ९० दिवसांत लाखोंची कमाई करा
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Sweet Corn Farming : पारंपरिक शेतीतून अपेक्षित नफा न मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी आता नव नवीन प्रयोग करत आहेत. त्यातीलच एक पीक स्वीट कॉर्नचं (गोड मका) आहे.
मुंबई : पारंपरिक शेतीतून अपेक्षित नफा न मिळत नसल्यामुळे अनेक शेतकरी आता नव नवीन प्रयोग करत आहेत. त्यातीलच एक पीक स्वीट कॉर्नचं (गोड मका) आहे. सध्या या पिकाच्या लागवडीकडे शेतकरी वळत आहेत. विशेष म्हणजे, नोव्हेंबर महिन्यात स्वीट कॉर्न लागवड केल्यास उत्तम उत्पादन आणि जास्त बाजारभाव मिळू शकतो. या पिकातून शेतकरी काही महिन्यांतच लाखो रुपयांचा नफा कमावू शकतात. या हंगामात हवामान, बाजारातील मागणी आणि उत्पादन खर्च यांचा योग्य संगम झाल्यास स्वीट कॉर्न शेती ग्रामीण भागातील नवा पैसा कमविण्याचा मार्ग ठरू शकतो.
नोव्हेंबर महिना लागवडीसाठी सर्वोत्तम
नोव्हेंबर महिना स्वीट कॉर्न लागवडीसाठी अत्यंत योग्य असतो. या काळात थंडीची सुरुवात होते आणि वातावरणातील आर्द्रता नियंत्रणात राहते. त्यामुळे झाडांची वाढ सशक्त होते आणि दाणे गोड, चमकदार व मोठे होतात. महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील अनेक शेतकरी या महिन्यात स्वीट कॉर्नची लागवड करतात.
लागवड आणि जाती
स्वीट कॉर्नसाठी सुपीक, निचरा होणारी मध्यम ते हलकी माती योग्य असते. साखरयुक्त (शुगर टाइप) आणि सुपर स्वीट टाइप अशा दोन मुख्य जातींचा वापर केला जातो. Madhuri, Priya, Sugar-75, WinSweet, Honey-86, Misthi या काही लोकप्रिय जाती आहेत. एक हेक्टर क्षेत्रावर लागवडीसाठी १५-२० किलो बियाणे पुरेसे असतात.
advertisement
शेतीची तयारी आणि खत व्यवस्थापन
शेत तयार करताना जमिनीची दोन-तीन नांगरणी करून पावसाचा ओलावा टिकवावा. बेसल डोस म्हणून १० टन शेणखत, ६० किलो नायट्रोजन, ४० किलो फॉस्फरस आणि ४० किलो पोटॅशियम द्यावे. नंतर तणनियंत्रणासाठी आंतरमशागत आवश्यक असते. ड्रिप सिंचन केल्यास पाण्याची बचत होते आणि उत्पादन वाढते.
एकरी खर्च आणि नफा
स्वीट कॉर्न लागवडीसाठी एकरी २५,००० ते ३०,००० रुपयांचा खर्च येतो. यामध्ये बियाणे, खत, मजुरी, सिंचन आणि इतर गोष्टींचा समावेश आहे. एका एकरातून साधारण १० ते १२ टन हिरवे कोब (Fresh Cob)तयार होतात. सध्या बाजारात स्वीट कॉर्नचा दर प्रति किलो २५ ते ३० रुपये असून, घाऊक विक्रीत १५ ते २० रुपये किलो मिळतात. त्यामुळे एकरी उत्पन्न १.५ ते २ लाख रुपये इतके मिळू शकते. खर्च वजा केल्यास शेतकऱ्यांना एकरी १ ते १.२५ लाख रुपयांचा निव्वळ नफा होतो.
advertisement
प्रक्रिया उद्योग आणि मागणी
view commentsशहरी भागात स्वीट कॉर्नची मागणी झपाट्याने वाढत आहे. फास्ट फूड, सॅलड, सूप आणि स्नॅक्समध्ये याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे अनेक फूड प्रोसेसिंग कंपन्या शेतकऱ्यांसोबत थेट करार करून खरेदी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना हमीभाव आणि स्थिर बाजारपेठ मिळत आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 09, 2025 11:40 AM IST


