Utpanna Ekadashi Upay: उत्पत्ती एकादशीला तुळशीसंबंधित केलेले हे उपाय वाया जात नाहीत, श्रीहरी कृपा

Last Updated:

Ekadashi Upay: कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी देवी एकादशी प्रकट झाली, म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असे नाव पडले.

News18
News18
मुंबई : हिंदू धर्मात एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे. उत्पत्ती एकादशीला वर्षातील सर्वात शुभ आणि फलदायी एकादशी मानलं जातं. कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला उत्पत्ती एकादशी साजरी केली जाते. पौराणिक मान्यतेनुसार, या दिवशी देवी एकादशी प्रकट झाली, म्हणून तिला उत्पत्ती एकादशी असे नाव पडले. या दिवशी व्रत केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि मोक्ष मिळतो, अशी धार्मिक श्रद्धा आहे.
शास्त्रांनुसार, जेव्हा मुर राक्षसाने देवांना त्रास दिला तेव्हा भगवान विष्णूने त्याला मारण्यासाठी युद्ध केले. युद्धादरम्यान, जेव्हा भगवान विश्रांती घेत होते, तेव्हा त्यांच्या शरीरातून एक दिव्य स्त्री प्रकट झाली. ती एकादशी देवी होती, तिने मुर राक्षसाचा वध केला. प्रसन्न होऊन भगवान विष्णूने तिला वरदान दिले की, या तिथीला जो कोणी व्रत करेल त्याला त्याच्या सर्व पापांची क्षमा होईल.
advertisement
या वर्षी उत्पत्ती एकादशी शनिवार, 15 नोव्हेंबर 2025 रोजी साजरी केली जाईल. भगवान विष्णूंसोबतच तुळशी मातेची पूजा करण्याचेही या दिवशी विशेष महत्त्व आहे, कारण ती देवी लक्ष्मीचे रूप मानली जाते. म्हणून, उत्पत्ती एकादशीला तुळशीशी संबंधित काही सोप्या विधी केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघांचेही आशीर्वाद मिळतात.
अलंकार अर्पण करा - या दिवशी, सकाळी स्नान केल्यानंतर, स्वच्छ कपडे घाला. तुळशी मातेला शुद्ध जल अर्पण करा. नंतर, तिला लाल चुनरी, सोळा अलंकार (बिंदी, बांगड्या, हळद-कुंकू, काजळ, कंगवा, गजरा इ.) आणि फुले अर्पण करा. असे केल्यानं तुळशी माता प्रसन्न होते आणि भक्तावर तिच्या आशीर्वादांचा वर्षाव करते. असे मानले जाते की उत्पत्ती एकादशीला अशा प्रकारे तुळशीची पूजा केल्याने घरात देवी लक्ष्मीचा कायमचा वास होतो, संपत्ती, समृद्धी आणि सौभाग्य वाढते. शिवाय, हा विधी वैवाहिक जीवनात प्रेम आणि गोडवा टिकवून ठेवतो.
advertisement
कच्चे दूध अर्पण करा - एकादशीला तुळशी मातेची पूजा केल्याने विशेष लाभ होतो. शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की या दिवशी तुळशी मातेला कच्चे दूध अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते. ही प्रथा भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी दोघांनाही प्रसन्न करते.
advertisement
सकाळी स्नान केल्यानंतर, तुळशीच्या झाडाला स्वच्छ पाणी घाला आणि नंतर कच्चे दूध अर्पण करा. त्यानंतर, तुळशीमातेसमोर तुपाचा दिवा लावा आणि "ॐ नमो भगवते वासुदेवाय" हा मंत्र भक्तीने म्हणा. या मंत्राचा जप केल्यानं वातावरण शुद्ध होते, मनाला शांती मिळते आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद लवकर मिळतात, असे मानले जाते.
तुळशीच्या मंजिरी - तुळशीच्या मंजिरींना या दिवशी विशेष महत्त्व आहे. या दिवशी पूजा केल्यानंतर तुळशीच्या थोड्या मंजिरी काढा आणि स्वच्छ लाल कपड्यात बांधा. नंतर त्या तुमच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवलेल्या ठिकाणी ठेवा. असं केल्यानं तुमच्या घरात संपत्ती वाढण्यास मदत होईल. आर्थिक अडचणी हळूहळू नाहीशा होऊ लागतात. ही प्रथा देवी लक्ष्मीला प्रसन्न करते.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
view comments
मराठी बातम्या/राशीभविष्य/
Utpanna Ekadashi Upay: उत्पत्ती एकादशीला तुळशीसंबंधित केलेले हे उपाय वाया जात नाहीत, श्रीहरी कृपा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement