Pomegranate Crop Disease : डाळिंब पिकावर रोगांचा प्रादुर्भाव? असं करा व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञांचा सल्ला, Video
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Mohan Najan
Last Updated:
डाळिंबावर मोठ्या प्रमाणावर किडे, फळ पोखरणारी अळी किंवा रस शोषणारे भुंगेरे यांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो.
सोलापूर : डाळिंबावर मोठ्या प्रमाणावर किडे, फळ पोखरणारी अळी किंवा रस शोषणारे भुंगेरे यांचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो. अशा किड्यांचा वेळेत बंदोबस्त करणे आवश्यक असते. जेणेकरून डाळिंबाचे नुकसान होणार नाही. या किड्यांचे नियंत्रण आणि रोगांचे व्यवस्थापन कसे करावे? यासंदर्भात अधिक माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कृषी विज्ञान केंद्र सोलापूरचे प्रमुख लालासाहेब तांबडे यांनी दिली.
सध्या सोलापूर जिल्हा सह अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण किंवा पावसाचे वातावरण आहे. अशा वातावरणामध्ये डाळिंबावर खोड किडा, भुंगेरे, फळ पोखरणारी अळी या रोगांचा प्रादुर्भाव होत असतो. डाळिंबाच्या झाडाची पाने, फांद्या पिवळे पडलेले दिसल्यास हे लक्षण खोडकिडा याचे आहे. तसेच खोडावर आणि फांद्यावर सुईसारख्या आकाराचे लहान छिद्र दिसतात.
advertisement
खोडकिडा रोगाचे व्यवस्थापन करायचे असेल तर डाळिंबाची बाग स्वच्छ ठेवली पाहिजे. यामध्ये पाणी साठवण होणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. जर शेतामध्ये पाणी साठवत असेल तर त्याचा लवकरात लवकर निचरा करावा. फांद्यावर किंवा खोडावर हा रोग झालेला असेल तर नष्ट करावे.
मर रोगाची लक्षणे आणि व्यवस्थापन
मर रोग हा जमिनीत वास्तव्य करणाऱ्या फ्युजारीन उडम या बुरशीमुळे होतो. अचानक झाडाचा शेंड्याकडील भाग हा पिवळा पडण्यास सुरुवात होते आणि काही दिवसानंतर ते पूर्ण झाड पिवळे पडून वाळून जातात. तसेच फळे असलेल्या फांद्या सुद्धा वाळून जातात परंतु न गळता तशाच त्या झाडाला लटकलेल्या असतात. जर या रोगाचा प्रादुर्भाव झालेला असेल तर प्रोपिकोनाझोल 25 टक्के इसी, क्लोरोपायरीफॉस 20 टक्के इसी प्रति लिटर पाण्यात मिसळून हे पाणी पाच ते दहा लिटर प्रमाणात प्रत्येक झाडाभोवती ड्रेसिंगच्या माध्यमातून द्यावेत.
advertisement
अशा पद्धतीने डाळिंब पिकाची काळजी घेतल्यास शेतकऱ्यांना डाळिंबापासून अधिकाधिक उत्पन्न मिळेल असा सल्ला सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख तथा वरिष्ठ शास्त्रज्ञ लालासाहेब तांबडे यांनी दिला आहे.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
Aug 23, 2025 6:57 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Pomegranate Crop Disease : डाळिंब पिकावर रोगांचा प्रादुर्भाव? असं करा व्यवस्थापन, कृषी तज्ज्ञांचा सल्ला, Video








