Agriculture News : शेतकऱ्यांनो, उडीद आणि मूग पिकावर रोगांचा प्रादुर्भाव? असं करा व्यवस्थापन, कृषी सल्ला, video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
उडीद आणि मूग पिकाची प्रामुख्याने पेरणी झाली असून जवळपास दीड महिन्याचे पीक झाले आहे. या पिकावरील रोग नियंत्रणात आणल्यास चांगल्या प्रकारे उत्पन्न निघू शकते.
सोलापूर - सोलापूर जिल्ह्यासह इतर जिल्ह्यात उडीद आणि मूग पिकाची प्रामुख्याने पेरणी झाली असून जवळपास दीड महिन्याचे पीक झाले आहे. या पिकावरील रोग नियंत्रणात आणल्यास चांगल्या प्रकारे उत्पन्न निघू शकते. उडदाचे रोग व्यवस्थापन कसे करायचे? यासंदर्भात अधिक माहिती सोलापूर कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. पंकज मडावी यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
उडीद आणि मूगवर बुरशीजन्य रोग, जिवाणूजन्य रोग आणि विषाणूजन्य रोग पडलेले पाहायला मिळतात. येलोमोजियाड, तांबेरा रोग, करपा रोग उडीद आणि मूगवर हे रोग प्रामुख्याने येतात. उडीदवर जर केसाळ अळी हा रोग आला असेल तर क्विनॉलफॉस 25 इसी 1 हजार मिली 500 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. तसेच एखाद्या झाडावर केसाळ अळीचा प्रादुर्भाव जास्त दिसल्यास ताबडतोब ती रोप तोडून त्यावरील केसाळ अळी नष्ट करून टाकावी. त्याचबरोबर या पिकावर भुरी, पिवळा विषाणू यांचा देखील प्रादुर्भाव असतो. जर उडीद किंवा मूग वर भुरी रोग पडल्यास पानावर सुरुवातीलाच लहान, अनियमित, पांढरे चट्टे दिसतात. भुरी रोग दिसताच फवारणी प्रति 10 लिटर पाण्यात कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम टाकून फवारणी करावी.
advertisement
तसेच उडीद आणि मूग या पिकांवरील पांढऱ्या माशांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये एकरी 15 पिवळे चिकट सापळे लावणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रोगग्रस्त झाडे दिसून येत असतील तर त्याला नष्ट करणे गरजेचे आहे. तसेच उडीद पिकावर शेंगा पोखरणारी अळी दिसून आल्यास फ्लूबेंडायअमाइड 39.35 टक्के प्रवाही 2 मिली यांची 10 लिटर पाण्यामध्ये टाकून फवारणी करावी. मूग आणि उडीद पिकावर पाने आकसाने हा विषाणूजन्य रोग असून तुडतुडा या किड्यापासून या रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळतो.
advertisement
या रोगामुळे कवळी पाने आकसतात आणि झाडाची वाढ थांबते आणि उत्पन्नात सुद्धा घट होते. हा रोग जर थांबवायचा असेल तर यासाठी फ्लूबेंडायअमाइड 6 ग्रॅम प्रति 10 लिटर पाणी मिसळून फवारणी करायची आहे. अशा पद्धतीने शेतकऱ्यांनी उडीद आणि मूग पिकावर पडणाऱ्या रोगाची काळजी घेतली तर नक्कीच शेतकऱ्यांना अधिकाधिक उत्पन्न मिळेल, अशी माहिती मोहोळ येथील कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. पंकज मडावी यांनी दिली.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
July 31, 2025 3:29 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : शेतकऱ्यांनो, उडीद आणि मूग पिकावर रोगांचा प्रादुर्भाव? असं करा व्यवस्थापन, कृषी सल्ला, video