तुमच्या ट्रॅक्टरला डिझेलचा खर्च जास्त होतोय का? मग ५ ट्रिक्स वापरा अन् पैसे वाचवा

Last Updated:

Tractor Maintainance Tips : आजच्या आधुनिक शेतीत ट्रॅक्टर हे अत्यावश्यक साधन बनले आहे. नांगरणीपासून ते पेरणी, फवारणी आणि कापणीपर्यंतच्या सर्व कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर होत आहे.

tractor news
tractor news
मुंबई : आजच्या आधुनिक शेतीत ट्रॅक्टर हे अत्यावश्यक साधन बनले आहे. नांगरणीपासून ते पेरणी, फवारणी आणि कापणीपर्यंतच्या सर्व कामांसाठी ट्रॅक्टरचा वापर होत आहे. परंतु, डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किंमतींमुळे शेतकऱ्यांचा खर्च झपाट्याने वाढला आहे. अशा स्थितीत काही सोप्या सवयी आणि तांत्रिक उपाय अवलंबले, तर शेतकरी डिझेलची मोठ्या प्रमाणावर बचत करू शकतात आणि ट्रॅक्टरचे आयुष्यही वाढवू शकतात.
इंजेक्टरची नियमित तपासणी करा
ट्रॅक्टरच्या इंजिनमधून काळा धूर येत असल्यास तो डिझेल जास्त प्रमाणात जळत असल्याचा संकेत आहे. यामागे इंजेक्टर किंवा इंजेक्शन पंपातील दोष कारणीभूत असतो. त्यामुळे दर दोन महिन्यांनी इंजेक्टर तपासणी करणे आवश्यक आहे. तपासणीनंतरही काळा धूर येत असेल, तर ट्रॅक्टरवर जादा भार (ओव्हरलोड) टाकला जात आहे का, हे पाहणे गरजेचे आहे.
advertisement
शेताच्या लांबीच्या दिशेने ट्रॅक्टर चालवा
अनेक शेतकरी ट्रॅक्टर रुंदीच्या दिशेने चालवतात, ज्यामुळे वारंवार वळणे घ्यावी लागतात. यामुळे वेळ आणि डिझेल दोन्ही वाया जातात. शेताच्या लांबीच्या दिशेने ट्रॅक्टर चालवले, तर वळणांची संख्या कमी होऊन डिझेलची बचत होते आणि कामही जलद पूर्ण होते.
एअर फिल्टर स्वच्छ ठेवा
ट्रॅक्टर सुरू करताना जर इंजिन मोठा आवाज करत असेल किंवा खडखडाट जाणवत असेल, तर ते हवेच्या कमतरतेचे लक्षण आहे. अशावेळी इंजिन योग्यरित्या चालत नाही आणि अधिक डिझेल वापरते. त्यामुळे एअर फिल्टर नियमित स्वच्छ करणे किंवा गरजेनुसार बदलणे आवश्यक आहे.
advertisement
इंजिनचे इंधन तेल वेळोवेळी बदला
जुने झालेले इंजिन तेल कार्यक्षमता कमी करते आणि डिझेलचा वापर वाढवते. म्हणून, इंधन तेल व फिल्टर नियमितपणे बदलणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे पंप सेट व वॉटर आउटलेट टॅपची तपासणी देखील करा, जेणेकरून इंजिन सुरळीत चालेल.
टायर प्रेशर योग्य ठेवा
ट्रॅक्टरच्या टायर्समध्ये हवा कमी असल्यास, त्याला जास्त ऊर्जा वापरावी लागते आणि त्यामुळे डिझेलचा अपव्यय होतो. म्हणून, योग्य टायर प्रेशर कायम ठेवणे अत्यावश्यक आहे. तसेच, इंजिनची नियमित सर्व्हिसिंग केल्यास डिझेलचा वापर नियंत्रित राहतो आणि ट्रॅक्टरचे आयुष्यही वाढते.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
तुमच्या ट्रॅक्टरला डिझेलचा खर्च जास्त होतोय का? मग ५ ट्रिक्स वापरा अन् पैसे वाचवा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement