कोंबडी स्वत:ची अंडी खात असतील तर त्यावर उपाय काय? एक्स्पर्टने दिला सल्ला

Last Updated:

Agriculture News : कुक्कुटपालन करताना अनेक शेतकऱ्यांना एक सामान्य पण त्रासदायक समस्या भेडसावते, ती म्हणजे कोंबड्यांकडून स्वतःची अंडी फोडून खाण्याची सवय.

poultry farm
poultry farm
मुंबई : कुक्कुटपालन करताना अनेक शेतकऱ्यांना एक सामान्य पण त्रासदायक समस्या भेडसावते, ती म्हणजे कोंबड्यांकडून स्वतःची अंडी फोडून खाण्याची सवय. ही समस्या पाहायला गंभीर वाटली तरी योग्य व्यवस्थापन आणि थोडी काळजी घेतल्यास ती सहजपणे नियंत्रणात आणता येऊ शकते, असे पशुपालन तज्ज्ञ सांगतात.
advertisement
कारण काय?
तज्ज्ञांच्या मते, कोंबड्या अंडी खातात यामागे प्रामुख्याने ताणतणाव, जागेची कमतरता, पोषणातील त्रुटी आणि घरट्याची अयोग्य रचना ही कारणे असतात. जर कोंबड्या खूपच अरुंद किंवा गर्दीच्या जागेत ठेवल्या असतील, तर त्यांच्यावर मानसिक ताण वाढतो. अशा परिस्थितीत त्या अस्वस्थ होतात आणि अंडी फोडू लागतात. त्यामुळे प्रत्येक कोंबडीसाठी किमान 1.5 ते 2 चौरस फूट मोकळी जागा उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे.
advertisement
आहारातील कमतरताही ही सवय वाढवते. विशेषतः कॅल्शियमच्या अभावामुळे अंड्यांचे कवच कमकुवत होते. अंडी सहज फुटतात आणि फुटलेली अंडी कोंबड्यांना खाण्याची सवय लागू शकते. त्यामुळे कोंबड्यांच्या आहारात कॅल्शियमयुक्त खाद्य, दगडी सिपीचे चूर्ण (ऑयस्टर शेल), हाडांचे पीठ किंवा विशेष पूरक आहार समाविष्ट करणे गरजेचे आहे. योग्य पोषण दिल्यास अंड्यांचे कवच मजबूत बनते आणि अंडी फुटण्याचे प्रमाण घटते.
advertisement
उपाय काय?
अंडी घालण्यासाठी असलेली घरटीही या समस्येत महत्वाची भूमिका बजावतात. घरटी जर अस्वच्छ, उघडी किंवा अस्थिर असतील, तर अंडी पडताना धक्का बसू शकतो आणि ती तुटू शकतात. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, कोंबड्यांसाठी गडद, शांत आणि मऊ बेडिंग असलेली सुरक्षित घरटी तयार करावीत. घरट्यात भाताचे तूस, करवंट्या किंवा गवताचा वापर केल्यास अंडी सुरक्षित राहतात.
advertisement
तसेच, घरट्यात अंडी जास्त वेळ ठेवणेही धोकादायक ठरू शकते. जास्त वेळ अंडी राहिल्यास ती चोच मारल्याने फुटण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दिवसातून किमान दोन ते तीन वेळा अंडी गोळा करणे उपयुक्त ठरते.
जर एखाद्या कोंबडीला आधीच अंडी खाण्याची सवय लागली असेल, तर ती सवय मोडण्यासाठी घरट्यात बनावट रबर किंवा सिरेमिक अंडी ठेवण्याचा सल्ला दिला जातो. चोच मारल्यानंतर काहीच मिळत नाही, हे लक्षात आल्यावर कोंबडी हळूहळू सवय सोडते.
advertisement
अगदीच हट्टी कोंबड्यांच्या बाबतीत त्यांना काही काळ वेगळे ठेवणे फायदेशीर ठरते. त्याचबरोबर घरट्यात अतिजोरदार प्रकाश टाळणे आवश्यक आहे, कारण तेजस्वी प्रकाशामुळेही कोंबड्यांची अस्वस्थता वाढून अंडी खाण्याचे प्रकार घडू शकतात.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
कोंबडी स्वत:ची अंडी खात असतील तर त्यावर उपाय काय? एक्स्पर्टने दिला सल्ला
Next Article
advertisement
Dharashiv News : कला केंद्रातील नर्तकीवर जीव जडला, प्रियकरानं स्वत:ला का संपवलं? समोर आलं शॉकिंग कारण
कला केंद्रातील नर्तकीवर जीव जडला, प्रियकरानं स्वत:ला का संपवलं? समोर आलं शॉकिंग
  • कला केंद्रातील नर्तकीवर जीव जडला, प्रियकरानं स्वत:ला का संपवलं? समोर आलं शॉकिंग

  • कला केंद्रातील नर्तकीवर जीव जडला, प्रियकरानं स्वत:ला का संपवलं? समोर आलं शॉकिंग

  • कला केंद्रातील नर्तकीवर जीव जडला, प्रियकरानं स्वत:ला का संपवलं? समोर आलं शॉकिंग

View All
advertisement