Agriculture News : शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! MahaDBT पोर्टलची सेवा तात्पुरती बंद, पुन्हा कधी सुरू होणार? वाचा सविस्तर

Last Updated:

MahaDBT Portal : राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग विविध कल्याणकारी योजना राबवतो. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ‘महाडीबीटी’ (MahaDBT) या शासकीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या या पोर्टलवर तांत्रिक सुधारणा सुरू असल्यामुळे अर्ज प्रक्रिया काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे.

News18
News18
मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांसाठी कृषी विभाग विविध कल्याणकारी योजना राबवतो. या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ‘महाडीबीटी’ (MahaDBT) या शासकीय पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, सध्या या पोर्टलवर तांत्रिक सुधारणा सुरू असल्यामुळे अर्ज प्रक्रिया काही काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, ही सुधारणा प्रक्रिया 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता असून, त्यानंतर पोर्टल पुन्हा कार्यान्वित केले जाईल.
प्रत्येक आर्थिक वर्षात महाडीबीटी पोर्टलमध्ये काही सुधारणा केल्या जातात. यंदाचे 2024-25 हे आर्थिक वर्ष 31 मार्च 2025 रोजी संपणार असून, नवीन 2025-26 आर्थिक वर्षाची सुरुवात १ एप्रिलपासून झाली आहे. नव्या आर्थिक वर्षात शेतकऱ्यांना अधिक सुलभ सेवा देण्यासाठी पोर्टलमध्ये काही तांत्रिक बदल व अद्यतने केली जात आहेत. याच कारणामुळे सध्या अर्ज प्रक्रिया थांबवण्यात आली आहे.
advertisement
या तात्पुरत्या बदलांबाबत शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी पोर्टलवर सूचना प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. सुधारणा पूर्ण झाल्यानंतर शेतकरी पुन्हा नव्याने नोंदणी करून विविध योजनांसाठी अर्ज सादर करू शकतील.
महाडीबीटी पोर्टलवर सध्या कृषी विभागाच्या खालील योजना उपलब्ध आहेत :
कृषी सिंचन योजना
कृषी यांत्रिकीकरण उप-अभियान
advertisement
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान
बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान
कोरडवाहू क्षेत्र विकास कार्यक्रम
भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना
राष्ट्रीय कृषी विकास योजना
राज्य कृषी यांत्रिकीकरण योजना
मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टलवर नोंदणी करणे अनिवार्य आहे. एकदा नोंदणी पूर्ण झाली की, शेतकरी संबंधित योजनांसाठी अर्ज सादर करू शकतात. अर्ज स्वीकृत झाल्यानंतर शासनाकडून अनुदान व इतर लाभ शेतकऱ्यांना देण्यात येतो.
advertisement
15 एप्रिलनंतर महाडीबीटी पोर्टल पुन्हा सुरू होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी थोडा संयम बाळगावा आणि नियमितपणे पोर्टलवर सूचनांची पाहणी करावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. सुधारित पोर्टल शेतकऱ्यांसाठी अधिक उपयुक्त व वापरण्यास सुलभ ठरणार असल्याची खात्रीही त्यांनी दिली आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Agriculture News : शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट! MahaDBT पोर्टलची सेवा तात्पुरती बंद, पुन्हा कधी सुरू होणार? वाचा सविस्तर
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement