लोकांनी चेष्टा केली! मात्र शेतीच्या त्या निर्णयावर ठाम राहिला, तरुण वर्षाला करतोय 2.5 कोटींची कमाई
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Success Story : आजचा तरुण वर्ग चांगल्या शिक्षणानंतर मोठ्या शहरांकडे धाव घेतो. उच्च पगाराची नोकरी, आधुनिक जीवनशैली हे त्यांचं स्वप्नं असते. मात्र काही तरुण असे असतात, जे स्वतःचा वेगळा मार्ग निवडतात.
मुंबई : आजचा तरुण वर्ग चांगल्या शिक्षणानंतर मोठ्या शहरांकडे धाव घेतो. उच्च पगाराची नोकरी, आधुनिक जीवनशैली हे त्यांचं स्वप्नं असते. मात्र काही तरुण असे असतात, जे स्वतःचा वेगळा मार्ग निवडतात. आणि यशस्वी होतात. आज आपण अशाच एका तरुणाची यशोगाथा जाणून घेणार आहोत. ज्याने बेंगळुरूमधील चांगल्या पगाराची नोकरी सोडून त्याने गावात परतण्याचा निर्णय घेतला आणि शेतीला आधुनिक व्यवसायाचे स्वरूप दिले. आणि आज तो कोट्यवधीची कमाई करत आहे.
advertisement
सामान्य कुटुंबात जन्म
प्रिन्स शुक्ला असं या तरुणाचे नाव असून तो बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील एका छोट्या गावातील रहिवासी आहे. लहानपणापासूनच त्याने शेतकऱ्यांचे कष्ट, त्यांचे नुकसान आणि बाजारातील अडचणी जवळून पाहिल्या. बी.एस्सी.चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्याने कृषी विषयात पदवी घेतली. त्याच्या मेहनतीमुळे त्याला बेंगळुरूमध्ये चांगली नोकरी मिळाली. सर्व काही सुरळीत सुरू असताना देखील गावाकडील शेतकऱ्यांची अवस्था त्याला अस्वस्थ करत होती. दरवर्षी नुकसान, महागडी बियाणे, बनावट खते आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव ही समस्या त्याच्या मनात घर करून बसली होती.
advertisement
एका निर्णयाने बदललं आयुष्य
प्रिन्सने पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे स्वप्न पाहिले होते. मात्र कोविड-19 लॉकडाऊनमुळे त्याला गावी परतावे लागले. हाच काळ त्याच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. गावात परतल्यावर शेतकऱ्यांच्या अडचणी प्रत्यक्ष पाहून त्याने शेतीकडे आधुनिक दृष्टीने पाहण्याचा निर्णय घेतला. परदेशी शिक्षणाचे स्वप्न बाजूला ठेवून त्याने शेतीलाच करिअर म्हणून स्वीकारले.
advertisement
1 लाखांचे भांडवल
फक्त 1 लाख रुपयांच्या भांडवलातून प्रिन्सने ‘AGRATE’ या कृषी स्टार्टअपची सुरुवात एका छोट्या खोलीतून केली. सुरुवातीला शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे, सेंद्रिय खते आणि आधुनिक शेती उपकरणे उपलब्ध करून देणे हेच त्याचे उद्दिष्ट होते. मात्र लवकरच त्याला जाणवले की फक्त साहित्य पुरवून प्रश्न सुटणार नाहीत. त्यामुळे त्याने शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यावर भर दिला. तो गावोगावी गेला, बैठका घेतल्या, व्हिडिओ कॉल, कार्यशाळा आणि मोबाईल अॅप्सच्या माध्यमातून शेतीचे नवे तंत्र शिकवले. पाणी व्यवस्थापन, सेंद्रिय शेती आणि योग्य पेरणी पद्धती यामुळे अनेक शेतकऱ्यांचे उत्पादन वाढले.
advertisement
लोकांनी चेष्टा केली
सुरुवातीला लोकांनी त्याची खिल्ली उडवली. ‘शहराची नोकरी सोडून शेती?’ असे प्रश्न त्याच्यावर पडले. काहींनी तर त्याला मूर्ख ठरवले. मात्र प्रिन्सने हार मानली नाही. मेहनतीचे फळ मिळू लागले आणि शेतकऱ्यांचे पीक दुप्पट होऊ लागले. आज ‘AGRATE’ची वार्षिक उलाढाल सुमारे 2.5 कोटी रुपये आहे. आयटीसी, पार्ले आणि नेस्ले यांसारख्या मोठ्या कंपन्या त्याच्याशी भागीदारी करत आहेत.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 13, 2025 7:10 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
लोकांनी चेष्टा केली! मात्र शेतीच्या त्या निर्णयावर ठाम राहिला, तरुण वर्षाला करतोय 2.5 कोटींची कमाई










