सेंद्रिय शेतीनं शेतकऱ्याचं नशीब उजाळलं, वर्षाला खर्च 25 हजार अन् कमाई लाखात, कसा केला प्रयोग यशस्वी?
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
प्रमोद इंगळे यांनी शेतीमध्ये रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांचा वापर न करता केवळ देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि इतर नैसर्गिक निविष्ठांचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने भरघोस उत्पादन घेण्याची किमया साधली आहे.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने शेती केल्यास अधिकाधिक उत्पन्न मिळू शकते. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव येथील शेतकरी प्रमोद महादेव इंगळे हे 2018 पासून रासायनिक खतांचा वापर न करता सेंद्रिय पद्धतीने द्राक्ष बागेची शेती करत आहेत. प्रमोद इंगळे हे एका एकरात द्राक्षाची बाग सेंद्रिय पद्धतीने करत असून या बागेसाठी त्यांना वर्षाला 25 ते 30 हजार रुपये पर्यंत खर्च येत आहे तर द्राक्ष विक्रीच्या माध्यमातून ते 5 ते 6 लाख रुपयांचा नफा मिळवत आहेत.
advertisement
प्रमोद इंगळे यांनी शेतीमध्ये रासायनिक खते किंवा कीटकनाशके यांचा वापर न करता केवळ देशी गायीचे शेण, गोमूत्र आणि इतर नैसर्गिक निविष्ठांचा वापर करून शास्त्रशुद्ध पद्धतीने भरघोस उत्पादन घेण्याची किमया साधली आहे. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या द्राक्षांना बाजारात शंभर रुपये किलो दराने विक्री ते करत आहेत.
advertisement
सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या द्राक्षांना सोलापूर जिल्ह्यासह पुणे, मुंबई, नाशिक, दिल्ली, हैदराबाद पर्यंत विक्रीसाठी पाठवत आहेत. सेंद्रिय पद्धतीने द्राक्षाची लागवड करण्यासाठी शेतकरी प्रमोद इंगळे यांना वर्षाला 25 ते 30 हजार रुपये पर्यंतचा खर्च येत आहे. तर द्राक्ष विक्रीच्या माध्यमातून प्रमोद इंगळे यांना 5 ते 6 लाखांचा नफा मिळत आहे.
शेतामध्ये रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय पद्धतीने शेतकऱ्यांनी शेती केली तर उत्पन्न देखील चांगले मिळेल. रासायनिक खतामुळे जमिनीचा होणारा नुकसान सुद्धा कमी होईल. शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त करून सेंद्रिय पद्धतीने शेती करावी, असे आवाहन प्रमोद इंगळे यांनी केले आहे.
advertisement
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
February 22, 2025 5:22 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
सेंद्रिय शेतीनं शेतकऱ्याचं नशीब उजाळलं, वर्षाला खर्च 25 हजार अन् कमाई लाखात, कसा केला प्रयोग यशस्वी?