दगाबाज तुर्कीला भारताचा दणका! कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर फिरणार पाणी

Last Updated:

Ind vs Turkey : भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानला तुर्की आणि उझबेकिस्तान यांच्याकडून मिळालेल्या पाठिंब्याचे आर्थिक पडसाद भारतात उमटू लागले आहेत.

News18
News18
मुंबई : भारताने पाकिस्तानवर केलेल्या कारवाईनंतर पाकिस्तानला तुर्की आणि उझबेकिस्तान यांच्याकडून मिळालेल्या पाठिंब्याचे आर्थिक पडसाद भारतात उमटू लागले आहेत. या देशांच्या भूमिकेला विरोध म्हणून भारतातील व्यापाऱ्यांनी तुर्कीतील फळे आणि ड्रायफ्रूट्सच्या खरेदीवर बहिष्कार टाकला आहे. याचा परिणाम मुंबईसह देशातील प्रमुख फळबाजारांमध्ये दिसू लागला असून, तुर्कीहून येणारी फळे आणि ड्रायफ्रूट्स बाजारातून हद्दपार होऊ लागली आहेत.
टर्कीच्या फळांवर बहिष्कार, सफरचंद, पीच, पेर गायब
मुंबई आणि नाशिकमधील घाऊक फळबाजारांमध्ये सध्या टर्कीमधील सफरचंद, पीच आणि पेर यांचे प्रमाण अत्यल्प झाले आहे. सफरचंदांचे प्रमाण केवळ 5% पर्यंत घसरले असून, व्यापाऱ्यांनी आयात थांबवल्याचे स्पष्ट केले आहे.
याशिवाय, तुर्कीहून येणारे 'कॅप्रीकॉट' हे प्रमुख ड्रायफ्रूटही बाजारातून अदृश्य झाले आहे. त्यामुळे भारतातून तुर्कीच्या कोट्यवधी रुपयांच्या व्यापारावर परिणाम झाल्याचे संकेत मिळाले आहेत.
advertisement
भारतात पर्यटकांचा तुर्की-उझबेकिस्तानला धक्का
तुर्की आणि उझबेकिस्तानने भारतविरोधी भूमिका घेतल्यानंतर भारतातील पर्यटकांनी या देशांतील सहली रद्द केल्या होत्या. यामुळे टूर ऑपरेटर, एजन्सी आणि व्यापाऱ्यांनीही पर्यायी देशांना प्राधान्य दिले. या निर्णयांमुळे दोन्ही देशांतील पर्यटन आणि फळ व्यापाराला आर्थिक झळ बसली आहे.
भारतासाठी तुर्की एक महत्त्वाची बाजारपेठ
तुर्कीमधून भारतात सर्वाधिक सफरचंद आयात केली जातात. याशिवाय, पीच आणि पेरचीही मर्यादित प्रमाणात आयात होते. टर्कीचे सफरचंद ही भारतातील बाजारातील सरासरी किमतीला स्पर्धा देणारी उत्पादने आहेत. आयात बंद झाल्यास देशांतर्गत सफरचंदाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.
advertisement
प्रमुख पर्याय देश
तुर्कीशिवाय भारतात फळांची आयात इराण, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड सारख्या देशांमधूनही होते. यामुळे काही प्रमाणात पुरवठा सुरळीत राहील, परंतु तुर्कीच्या अनुपस्थितीमुळे दरवाढ निश्चित आहे, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दरम्यान, तुर्की व उझबेकिस्तानकडून पाकिस्तानला दिलेल्या राजकीय पाठिंब्याचा परिणाम केवळ कागदोपत्री नाही, तर भारतीय बाजारपेठेत प्रत्यक्षात जाणवू लागला आहे. व्यापार, पर्यटन आणि आयातीवर होणारे हे परिणाम दोन्ही देशांसाठी धोक्याचा इशारा ठरू शकतात. भारतीय ग्राहक आणि व्यापाऱ्यांनी दाखवलेली ही आर्थिक एकजूट देशहितासाठी प्रभावी ठरत असल्याचे या घडामोडींवरून स्पष्ट होते.
मराठी बातम्या/कृषी/
दगाबाज तुर्कीला भारताचा दणका! कोट्यवधी रुपयांच्या उलाढालीवर फिरणार पाणी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement