advertisement

Union Budget 2025 :अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय मिळालं? जाणून घ्या सविस्तर

Last Updated:

Agriculture News : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? हेच आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.

News18
News18
मुंबई : अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज देशाचा अर्थसंकल्प सादर केला आहे. यामध्ये शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत. याचा महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कसा फायदा होणार? हेच आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत.
पंतप्रधान धन धन्य कृषी योजना
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठी भेट दिली. त्यांनी शेतकऱ्यांसाठी 'प्रधानमंत्री धन धान्य कृषी योजना' जाहीर केली. या योजनेचा उद्देश कृषी उत्पादन वाढवण्यासाठी धोरण तयार करणे आहे. या योजनेअंतर्गत, देशातील त्या 100 जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित केले जाईल जिथे कृषी उत्पादन कमी आहे. याचा थेट फायदा देशातील 1.74 कोटी शेतकऱ्यांना होईल असा विश्वास आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे. राज्यात विशेषत: विदर्भ,मराठवाड्यामध्ये धान्य मोठ्या प्रमाणात पिकवले जाते. त्यामुळे या योजनेचा फायदा होणार आहे.
advertisement
मसूर, तूर आणि उडीद उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार दिलासा
अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी आपल्या भाषणात मसूर, तूर आणि उडीदचे उत्पादन वाढवण्याचा उल्लेख केला आहे. तसेच मसूर, तूर आणि उडीद हे पुढील 4 वर्ष एमएसपी दराने खरेदी केले जाणार आहे. महाराष्ट्रातील शेतकरी हे मसूर, तूर आणि उडीदचे उत्पादन घेतात त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.
advertisement
कर्ज मर्यादा वाढवली
किसान क्रेडिट कार्ड योजनेत मोठा बदल करण्यात आला आहे. या योजनेची 3 लाखांची कर्ज मर्यादा काढून टाकण्यात आली आहे. नवीन नियमानुसार शेतकऱ्यांना 5 लाख रुपयांपर्यंत कर्ज घेता येणार आहे.
शेतकऱ्यांच्या अपेक्षा काय होत्या?
1) बियाणे खते तसेच कीटकनाशकांवर मिळणाऱ्या अनुदानात वाढ करावी अशी शेतकऱ्यांची इच्छा होती. ज्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात लागणारा खर्च कमी होईल.
advertisement
2) कृषी व्यवसायात उत्पादन खर्च मोठया प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज घ्यावे लागते. अशातच आता शेतकऱ्यांना बँकांकडून शून्य टक्के व्याज दरात कर्ज मिळावे. तसेच कर्जमाफीसाठी ठोस योजना अंमलात आणावी जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होईल.
3) महाराष्ट्रासह देशभरातील अनेक राज्यांमध्ये पाणी प्रश्न हा अत्यंत गंभीर आहे. त्यावर त्यावर उपाययोजना कराव्यात. तसेच नवीन सिंचन योजना आणि नदीजोड प्रकल्प राबण्यात यावेत.
advertisement
4) बदलत्या वतावरणावर मात करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात यावे आणि त्यावर उपाययोजना कराव्यात.
5) शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी. तसेच ड्रोन तंत्रज्ञान, स्मार्ट सिंचन आणि हवामान अंदाज यंत्रणा पुरवण्यासाठी आवश्यक असा निधी देण्यात यावा.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Union Budget 2025 :अर्थसंकल्पातून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना काय मिळालं? जाणून घ्या सविस्तर
Next Article
advertisement
Gold Silver Price:  ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चांदीही महागली, एक्सपर्ट म्हणतात, 'आता...'
ट्रम्प यांची एक धमकी अन् बाजारात उलथापालथ, सोन्यानं गाठला रेकोर्ड ब्रेक दर, चां
  • मागील काही दिवसांपासून सोनं-चांदीच्या दरात तुफान तेजी आली आहे.

  • सोनं-चांदीचे दर नवीन उच्चांक गाठत आहेत.

  • आज, जागतिक बाजारपेठेत सध्या सोन्याने सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.

View All
advertisement