जनावरांच्या चाऱ्यासाठी सरकार देतंय मोफत बियाणे, या तारखेपर्यंत करता येणार अर्ज
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Mofat Chara Biyane Yojana : रब्बी हंगाम २०२५-२६ साठी राज्यातील पशुपालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. दुभत्या जनावरांना पौष्टिक आणि दर्जेदार चारा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
लातूर : रब्बी हंगाम २०२५-२६ साठी राज्यातील पशुपालकांसाठी दिलासादायक बातमी आहे. दुभत्या जनावरांना पौष्टिक आणि दर्जेदार चारा उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, सुधारित संकरित चारा बियाणे (Hybrid Fodder Seeds) पशुपालकांना १०० टक्के अनुदानावर मोफत उपलब्ध करून दिले जाणार आहेत. या योजनेमुळे दुग्धोत्पादन वाढीस चालना मिळणार असून पशुधनाचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.
योजनेचा लाभ कोणाला मिळणार?
ही योजना लातूर जिल्ह्यातील सर्व दहा तालुक्यांतील पात्र शेतकरी व पशुपालकांसाठी राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने सर्व इच्छुक पशुपालकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत १५ ऑक्टोबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर सादर केलेले किंवा अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुलकुमार मीना यांनी दिली आहे.
advertisement
अर्ज कुठे करायचा?
सुधारित संकरित चारा बियाणे १०० टक्के अनुदानावर मोफत दिले जाणार
अर्ज सादरीकरणाचे ठिकाण : नजीकचा पशुवैद्यकीय दवाखाना
अर्जाचा नमुना आणि आवश्यक कागदपत्रे पंचायत समिती व दवाखान्यात उपलब्ध
लाभार्थ्यांची निवड सोडत पद्धतीने (Lottery System) करण्यात येणार
अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, अर्ज पूर्ण आणि योग्य कागदपत्रांसह वेळेत सादर करणे अत्यावश्यक आहे. अपूर्ण अर्जामुळे पात्र लाभार्थ्यांचे नुकसान होऊ शकते.
advertisement
पात्रता निकष काय आहेत?
अर्जदाराकडे भारत पशुधन प्रणालीवर नोंदणीकृत किमान ३ ते ४ दुभती जनावरे असणे आवश्यक.अर्जदाराकडे स्वतःची शेतजमीन आणि सिंचनाची सुविधा असावी. सर्व प्रवर्गातील पशुपालकांना अर्ज करण्याची परवानगी आहे.
या अटी पूर्ण करणाऱ्या पशुपालकांना अर्ज करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. योजनेतून दुभत्या जनावरांच्या पोषणात सुधारणा, दुधाचे उत्पादन वाढ, तसेच चाऱ्याची गुणवत्ता सुधारेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
advertisement
योजनेचे उद्दिष्ट काय?
या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे राज्यातील पशुधनाला पौष्टिक, प्रथिनयुक्त व हिरवा चारा उपलब्ध करून देणे. सध्या अनेक भागांमध्ये कोरडवाहू परिस्थितीमुळे चाऱ्याची टंचाई निर्माण होते. त्यामुळे सरकारकडून राबवण्यात येणाऱ्या या १०० टक्के अनुदानित योजनेमुळे पशुपालकांना मोठा आर्थिक दिलासा मिळेल.
Location :
Latur,Maharashtra
First Published :
October 09, 2025 10:47 AM IST