नोकरीपेक्षा शेतीच भारी! 7 एकरात 70 लाख घेणार, युवा शेतकऱ्यानं सांगितला कमाईचा फॉर्म्युला!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
तरुण शेतकरी बालाजी बाबुराव भोसले पापरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांचे शिक्षण बी.एससी.ॲग्री पर्यंत झाले आहे. बारावीतच असताना त्यांनी नोकरीच्या मागे न धावता शेती करायचा निर्णय घेतला.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : एकीकडे द्राक्ष बागेतून उत्पन्न मिळत नसल्यामुळे शेतकरी द्राक्षांची बाग काढत आहेत. तर दुसरीकडे सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी येथील तरुण शेतकरी बालाजी बाबुराव भोसले यांनी त्यांच्याकडील सात एकरात द्राक्षांची लागवड केली असून तब्बल एका एकरातून 10 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. या द्राक्ष बागेचे संगोपन कसे केले? किती खर्च आला? या संदर्भात अधिक माहिती तरुण शेतकरी बालाजी भोसले यांनी लोकल 18 शी बोलताना दिली.
advertisement
तरुण शेतकरी बालाजी बाबुराव भोसले पापरी तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यांचे शिक्षण बी.एससी. ॲग्रीपर्यंत झाले आहे. बारावीतच असताना त्यांनी नोकरीच्या मागे न धावता शेती करायचा निर्णय घेतला. बालाजी यांनी सात एकरमध्ये माणिक चमन वाणाच्या द्राक्ष बागेची लागवड केली आहे. बाजारात माणिक चमन या वाणाच्या द्राक्षाला मागणी भरपूर आहे. तसेच द्राक्षेला भाव नसल्यास माणिक चमन पासून बेदाणा देखील तयार करता येते. म्हणून बालाजी भोसले यांनी माणिक चमन द्राक्षाच्या वाणाची बाग तयार केली आहे.
advertisement
उसावर भारी ठरली केळीची शेती, शेतकऱ्यानं 10 महिन्यात घेतलं 14 लाखांचं उत्पन्न, असा केला प्रयोग यशस्वी
द्राक्षांच्या बागेत दररोज पाहणी करून योग्य त्या औषधांची फवारणी बालाजी भोसले यांनी केली आहे. त्यामुळे या द्राक्षांवर कोणत्याही प्रकारचा रोग आला नाही. तसेच कोणत्या वातावरणामध्ये कोणता रोग येतो हे देखील शेतकऱ्यांना माहिती असणे आवश्यक आहे. सात एकरमध्ये लागवड केलेल्या माणिक चमन या द्राक्षांच्या वाणापासून प्रती एकर 25 टन पर्यंत माल निघणार आहे. या द्राक्ष बागेला प्रती एकर 2 लाख रुपयेपर्यंत खर्च आला आहे. तर एका एकरातून तरुण शेतकरी बालाजी भोसले यांना 10 लाखांचे उत्पन्न मिळणार आहे. म्हणजेच सात एकरातून 70 लाखांचा नफा मिळणार आहे.
advertisement
काहीतरी करून दाखवायची जिद्द असेल तर येणाऱ्या काळात फक्त शेतीच हा एकमेव पर्याय आहे. शहरी भागात जाऊन नोकरी करण्यापेक्षा शेती करून स्वतः मालक होऊन हा अनुभव वेगळाच असतो. म्हणून तरुणांनी शेतीकडे वळावे, असे आवाहन तरुण शेतकरी बालाजी बाबासाहेब भोसले यांनी केले आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
February 05, 2025 2:18 PM IST
मराठी बातम्या/कृषी/
नोकरीपेक्षा शेतीच भारी! 7 एकरात 70 लाख घेणार, युवा शेतकऱ्यानं सांगितला कमाईचा फॉर्म्युला!