जगातील फक्त तीन व्यक्ती पासपोर्टशिवाय जगभर प्रवास करू शकतात. ते आहेत ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे, जपानचे सम्राट नारुहितो आणि त्यांची पत्नी, महाराणी मसाको. हे तिघंही शाही विशेषाधिकारांमुळे पासपोर्ट फ्री प्रवेशाचा आनंद घेतात.
युनायटेड किंग्डमचे पासपोर्ट राजाच्या नावाने जारी केले जातात. त्यावर किंग पासपोर्ट असं लिहिलेलं असतं. म्हणून राजा चार्ल्स तिसरा यांना स्वतः पासपोर्टची आवश्यकता नाही. ते देशाचे सार्वभौम आहेत आणि त्यांचा शब्दच कायदा आहे. राणी एलिझाबेथ द्वितीय यांच्या बाबतीतही असंच होतं. त्यांना कधीही पासपोर्ट मिळाला नाही. 2023 मध्ये चार्ल्सच्या राज्याभिषेकानंतर हा विशेषाधिकार आणखी मजबूत झाला.
advertisement
जपानमध्येही असाच नियम आहे. सम्राट नारुहितो आणि महाराणी मासाको हे जपानी संविधानानुसार प्रतीकात्मक सार्वभौम आहेत. जपानी सरकार त्यांना पासपोर्ट जारी करत नाही, तर राजनैतिक प्रोटोकॉलनुसार प्रवास करतात. 2019 मध्ये नारुहितोच्या राज्याभिषेकानंतर त्यांचा पहिला परदेश दौरा ब्रिटनला होता, जिथं त्यांचं कोणत्याही कागदपत्रांशिवाय स्वागत करण्यात आलं.
देशांशी द्विपक्षीय करारांमुळे हे तिघंही 190 हून अधिक देशांमध्ये प्रवेश करू शकतात. पण हे दौरे वैयक्तिक प्रवासासाठी नसून राज्य भेटी, समारंभ किंवा राजनैतिक हेतूंसाठी आहेत. हा विशेषाधिकार केवळ प्रवासापुरता मर्यादित नाही. त्यांना राजनैतिक प्रतिकारशक्ती देखील मिळते, म्हणजेच कोणत्याही देशात अटक किंवा चौकशीपासून स्वातंत्र्य. ते कधीही त्याचा गैरवापर करत नाहीत.
Cockroaches : काय सांगता! झुरळ बनवतंय मालामाल, पण कसं काय?
उदाहरणार्थ, महाराणी मासाकोच्या 2024 च्या युरोप भेटीदरम्यान फ्रान्सने व्हिसा तपासणीशिवाय विशेष सुरक्षा प्रदान केली. त्याचप्रमाणे किंग चार्ल्सच्या ऑस्ट्रेलिया भेटीला विमानतळावर लाल कार्पेट अंथरण्यात आला. जपानच्या सम्राटाला "टेन्नो" म्हटलं जातं, ज्याला देवांचे वंशज मानलं जातं, म्हणूनच त्यांचा अलौकिक दर्जा. ब्रिटनमध्ये, सम्राटाला राज्यप्रमुख ही पदवी आहे, जी राष्ट्रकुल देशांमध्ये मान्यताप्राप्त आहे. पण काही सोर्समध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांकडे लेसेझ-पास म्हणजे प्रवास दस्तऐवज असल्याचंदेखील नमूद केलं आहंय, परंतु ते राष्ट्रीय पासपोर्टऐवजी पासपोर्टसारखं आहे. फक्त या राजघराण्यांनाच खरं पासपोर्टचं स्वातंत्र्य आहे.
भारतातील नियम काय आहेत?
भारतात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे राजनैतिक पासपोर्ट आहे, पण परदेश प्रवासासाठी व्हिसा आवश्यक आहे. पंतप्रधान मोदींच्या 100+ परदेश दौऱ्यांमध्ये नेहमीच कागदपत्रांची प्रक्रिया असते. परंतु हे राजघराणे वेगळे आहेत. जपानमध्ये सम्राटाच्या भेटी जपानी परराष्ट्र मंत्रालयाद्वारे आयोजित केल्या जातात आणि यजमान देश प्रोटोकॉलचं पालन करतो. ब्रिटिश परराष्ट्र कार्यालय राजाच्या दौऱ्याचे नियोजन करतं. 2025 मध्ये नारुहितो यांच्या भारत भेटीची चर्चा होत आहे. ते पासपोर्टशिवाय दिल्लीत येतील. पर्यटन तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हे नियम जागतिक राजनैतिकतेला बळकटी देतात, पण सामान्य माणसासाठी ते स्वप्नच राहिली आहेत.