जालना: सोशल मीडियावर एका ऊस उत्पादक शेतकऱ्याचा व्हिडिओ खूप व्हायरल होतोय. या शेतकऱ्यानं आपल्या शेतातील ऊस चक्क डीजे लावून कारखान्यापर्यंत पोहोचवला आहे. धीरज जिगे असं या युवा शेतकऱ्याचं नाव असूनजालना जिल्ह्यातील मठ पिंपळगाव येथे त्यांची शेती आहे. विशेष म्हणजे ऊस कारखान्यात पाठवण्यासाठी डीजे लावण्याचं कारणही खास आहे. याबाबतच शेतकरी धीरज जिगे यांनी लोकल18 सोबत बोलताना माहिती दिलीये.
advertisement
धीरज जिगे यांचं एकत्र कुटुंब असून त्यांची मठ पिंपळगाव येथे 40 एकर शेती आहे. पूर्वापार शेती करणाऱ्या जिगे कुटुंबीयांनी गेल्या काही वर्षांत उसाची शेती सुरू केलीये. यंदा त्यांनी 20 एकर क्षेत्रावर उस लागवड केली होती. आता 4 एकर उसाची तोडणी झाली असून यामध्ये त्यांना उसाचे 200 टन उत्पादन निघाले आहे. भरघोस उत्पन्नामुळे जिगे कुटुंबीय खूश असून त्यांनी आपला आनंद अनोख्या पद्धतीनं साजरा केला आहे.
घे भरारी! शेतमजूर महिलेनं करून दाखवलं, महाराष्ट्रात फेमस झालाये हा ब्रँड!
डीजे लावून कारखान्याला पाठवला ऊस
यंदा 4 एकरात 200 टन ऊस निघाला. आणखी 16 एकर क्षेत्रातील ऊसतोड बाकी आहे. या उसाला सुरुवातील 2500 रुपये तर दुसरा हप्ता 200 रुपये असा 2700 रुपयांचा दर मिळणार असल्याने बक्कळ कमाई होणार आहे. एकरी सरासरी 50 टन उतारा निघत असून सव्वा ते दीड लाखापर्यंत उत्पन्न निघणार आहे. त्यामुळे जिगे कुटुंबीय आनंदात असून त्यांनी शेतातील ऊस चक्क डीजे लावून कारखान्यापर्यंत पोहोचवला आहे. त्यांच्या या अनोख्या सेलिब्रेशनची सर्वत्र चर्चा आहे.
..म्हणून लावडा डीजे
यंदा ऊस शेतीतून चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे आम्ही समाधानी आहोत. एकरी सव्वा ते दीड लाखापर्यंत उत्पन्न निघण्याची शक्यता आहे. एवढं उत्पन्न दुसऱ्या कोणत्याही पिकातून शक्य नाही. यंदा केलेल्या मेहनतीला आणि कष्टाला चांगलं फळ मिळताना दिसतंय. त्यामुळे ऊस कारखान्यात पोहोच होत असल्याच्या आनंदात त्यांनी डीजे लावून आपला आनंद उत्सव साजरा केल्याचं धीरज यांनी लोकल18 सोबत बोलताना सांगितलं.
दरम्यान, सध्याच्या काळात वाढदिवस, मिरवणुका किंवा इतर कार्यक्रमात डीजे लावून सेलिब्रेशन केल्याचं सर्वांनी ऐकलं असेल. पण एका शेतकऱ्याचं नादखुळा सेलिब्रेशन सर्वत्र चर्चेचा आणि कुतुहलाचा विषय ठरतंय.