कोणत्या पिकांसाठी स्पर्धा?
खरीप हंगामासाठी राज्य सरकारने 11 पिकांची निवड केली आहे. यामध्ये भात, नाचणी, ज्वारी, बाजरी, मका, सोयाबीन, मूग, उडीद, भुईमूग आणि सूर्यफूल अशा पिकांचा समावेश आहे. मूग आणि उडीद या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 जुलै 2025 आहे तर उर्वरित नऊ पिकांसाठी 31 ऑगस्ट 2025 ही अंतिम तारीख आहे.
advertisement
छ. संभाजीनगरच्या शेतकऱ्यानं लावलं पैशाचं पीक, 8 एकरात 5000000 रुपयांची कमाई, यशाचा मंत्र काय?
आवश्यक कागदपत्रे
या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे स्वतःच्या नावे किमान एक एकर जमीन असणे आवश्यक आहे. ज्या पिकासाठी स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे त्या पिकाचे किमान एक एकर क्षेत्र असावे लागणार आहे. जमिनीचा सातबारा किंवा आठ अ, स्पर्धेत सहभागी होण्यासाठीचा नमुना अर्ज, जमिनीचा चिन्हांकित केलेला नकाशा, बँक खात्याचा तपशील असलेले पासबुक इत्यादी कागदपत्रे आवश्यक असणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शुल्क
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी सर्वसाधारण गटातील शेतकऱ्यांसाठी 300 रुपये तर आदिवासी गटातील शेतकऱ्यांसाठी दीडशे रुपये एवढे शुल्क आकारले जाणार आहे.
किती मिळणार बक्षीस?
स्पर्धेतील विजेत्यांना तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या शेतकऱ्यांना अनुक्रमे पाच, तीन, आणि दोन हजार रुपये एवढं बक्षीस देण्यात येणार आहे. जिल्हास्तरावर प्रथम, द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या शेतकऱ्यांना अनुक्रमे दहा हजार सात हजार आणि पाच हजार रुपये एवढं बक्षीस मिळणार आहे. राज्यस्तरावर प्रथम द्वितीय आणि तृतीय येणाऱ्या शेतकऱ्यांना अनुक्रमे 50 हजार 40 हजार आणि 30 हजार रुपये पारितोषिक मिळणार आहे.
संपर्क कुठे?
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या जवळच्या तालुका कृषी कार्यालयाशी किंवा गावच्या कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क करावा, असं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे.