पंढरपूर तालुक्यातील कोर्टी गावात राहणारे शेतकरी दत्तात्रय माने यांनी दीड एकरात केळीची लागवड केली आहे. गेल्या महिनाभरापासून केळीच्या बाजारभावात अभूतपूर्व घसरण झाली असून केळीला प्रति किलो दोन ते तीन रुपयाने भाव मिळत असल्याने शेतकरी हताश अवस्थेत असल्याचं दिसत आहे.
advertisement
दत्तात्रेयांनी दीड एकरामध्ये पंधराशे केळीच्या रोपांची लागवड केली आहे. दीड एकरामध्ये 7 बाय 4 याप्रमाणे केळीच्या रोपांची लागवड केली. दोन रुपये किलो दराने केळीला दर मिळत असल्याने 3 गाड्या पिकअप गाडी केळी व्यापाऱ्याने खरेदी करून गेल्यावर 30 हजार रुपये मिळाले आहे. यातून लागवडीचा खर्च लांबच केळीच्या रोपांचा सुद्धा खर्च निघत नसल्याची खंत दत्तात्रय माने यांनी व्यक्त केली.
मागील काही महिन्यांपूर्वी केळीला सरासरी 20 ते 27 रुपये किलो दर मिळत होता. पण आता दर केळीला 2 ते 3 रुपये किलोवर दर आला आहे. साधारणतः केळीला 20 रुपये किलो दर मिळाला असता तर लागवडीचा खर्च निघाला असता पण सध्या मिळत असलेल्या दरामुळे फवारणीचा, रोपांचा सुद्धा खर्च निघत असल्याची खंत शेतकरी दत्तात्रय माने यांनी दिली. पोटच्या लेकराप्रमाणे जपलेल्या केळीच्या बागा ट्रॅक्टरच्या सहाय्याने मोडून काढायची वेळ बळीराजावर आली आहे.





