आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचे दर नरमले आहेत. यंदाच्या हंगामामध्ये ब्राझील, अर्जेन्टिना आणि अमेरिका या देशांमध्ये सोयाबीनचे उत्पादन चांगले मिळणार असल्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे सोयापेंडीचे उत्पादन वाढलेले आहे. या दोन कारणांचा प्रभाव हा सोयाबीनच्या दरावर होत आहे.
अमेरिकेमध्ये सध्या 70% सोयाबीनची काढणी पूर्ण झाली आहे. यंदा सोयाबीनला वातावरण अनुकूल मिळाल्यामुळे विक्रमी उत्पादन मिळणार आहे. तर दुसरीकडे भारताच्या सोयाबीनच्या उत्पादनात अडीच
advertisement
टक्के वाढ झाली आहे. महाराष्ट्र, तेलंगाणा, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, आणि गुजरात या राज्यांमध्ये कमी अधिक प्रमाणात लागवड वाढली आहे, तसेच यंदा चांगला पाऊस झाल्यामुळे सोयाबीनचे चांगले उत्पादन मिळेल असा अंदाज शासन आणि उद्योग क्षेत्राने व्यक्त केला आहे.
परंतु अवकाळी पावसामुळे महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश आणि राजस्थानमधील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर शेंगा न पोसणे, शेंगा कमी लागणे. शेंगांमध्ये दाण्यांची संख्या कमी असणे अशा तक्रारी येऊ लागल्या आहेत. तसेच मागील काही दिवसांपासून पडलेल्या पावसामुळे प्रचंड नुकसान झाले आहे.
बाजारभाव कधी वाढणार?
सरकारी खरेदीने वेग घेतला तर खुल्या बाजारातही भाव हे हमी भावापर्यंत पोहोचू शकतात. तसेच अंतरराष्ट्रीय बाजारातील काही हालचाली झाल्या तर सोयाबीन 5 हजारांचा टप्पा पार करू शकतील.
दरम्यान, सध्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या दरावरून संताप व्यक्त करत आहेत. आद्रतेचे कारण सांगून व्यापारी लूटमार करतात. अशी तक्रार शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे.