TRENDING:

Tomato Farming : तंत्रज्ञानाचा वापर करून घरातल्या कुंडीमध्येच 'टोमॅटो' शेती करा, लागवड कशी करावी? जाणून घ्या

Last Updated:

Agriculture News : अनेकांना भाजीपाला घरीच पिकवायचा असतो, पण जागेअभावी ते करू शकत नाहीत. तुमच्या घरात मोठी बाल्कनी किंवा अंगण किंवा टेरेस नसेल तर तुम्ही परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून बकेटद्वारे टोमॅटो पिकवू शकता. डच बकेट पद्धत परदेशात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. याद्वारे तुम्ही बकेटमध्ये टोमॅटो देखील वाढवू शकता. मग आता ते कसं? त्याच्या टिप्स काय आहेत? हेच आपण जाणून घेऊ

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अनेकांना भाजीपाला घरीच पिकवायचा असतो, पण जागेअभावी ते करू शकत नाहीत. तसेच भाजी पाल्याच्या कमी जास्त होणाऱ्या किंमती आणि चांगला दर्जाचा भाजीपाला खाण्याचा लोक प्रयत्न करत असतात.  जर तुमच्या घरात मोठी बाल्कनी किंवा अंगण किंवा टेरेस नसेल तर तुम्ही परदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून बकेटद्वारे टोमॅटो पिकवू शकता. डच बकेट पद्धत परदेशात मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. याद्वारे तुम्ही बकेटमध्ये टोमॅटो देखील वाढवू शकता. मग आता ते कसं त्याच्या टिप्स काय आहेत? हेच आपण जाणून घेऊ
घरातल्या कुंडीमध्येच 'टोमॅटो' शेती करा
घरातल्या कुंडीमध्येच 'टोमॅटो' शेती करा
advertisement

'या' आहेत  टिप्स

1) सर्वप्रथम तुम्हाला झाकण असलेली बकेट लागेल. ज्यामध्ये टोमॅटोची लागवड करता येईल. यासोबतच टोमॅटोची झाडे, वाढणारी मध्यम यासाठी परलाइट आणि सबमर्सिबल पंप आवश्यक असेल.

2) आता तुम्हाला रोपांना पोषक द्रव्य देण्यासाठी त्यात एक पाईप बसवावा लागेल, जो टोमॅटोच्या बकेटला जोडावा. जेणेकरून पोषक द्रव्ये रोपापर्यंत पोहचेल.

3) यानंतर, टोमॅटोची रोपे पेरलाइटमध्ये लावावीत. परलाइट हा एक प्रकारचा कंपोस्ट आहे, जो वनस्पतींच्या मुळांना ताकद देतो. रोपे लावण्यापूर्वी, बादलीमध्ये लहान छिद्र करून घ्यावी. पाईप परलाइटमध्ये आणि बादलीच्या वरच्या भागात ठेवावी. जेणेकरुन सर्व आवश्यक पोषक द्रव्ये थेट झाडांच्या मुळांपर्यंत पोहोचवता येतील.

advertisement

4) लागवड केल्यानंतर रोपांवर नेहमी लक्ष ठेवा. यासोबतच पोषक तत्वांची पीएच पातळी वेळोवेळी तपासणे देखील आवश्यक आहे. जर ते मानक पातळीपेक्षा कमी असेल, तर त्वरित सुधारणा करण्याचा प्रयत्न करावा. असे केल्यास तुम्हाला रोग आणि किडींवरही लक्ष ठेवता येईल. आणि तुम्हाला चांगले उत्पादनही मिळवता येईल.

मराठी बातम्या/कृषी/
Tomato Farming : तंत्रज्ञानाचा वापर करून घरातल्या कुंडीमध्येच 'टोमॅटो' शेती करा, लागवड कशी करावी? जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल