योजनेचा उद्देश
या योजनेचा प्रमुख उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर आणि त्याच्या उपसाधनांच्या खरेदीसाठी आर्थिक मदत करणे. ट्रॅक्टर हे शेतीतील सर्वात महत्त्वाचे यंत्र असून त्याच्या मदतीने नांगरणी, पेरणी, पाणी देणे आणि काढणीची कामे सुलभ होतात. पारंपरिक पद्धतींवर अवलंबून राहणाऱ्या शेतकऱ्यांना आधुनिक शेतीकडे वळवण्यासाठी ही योजना महत्त्वाची मानली जाते.
अनुदानाची रक्कम
advertisement
या योजनेत पात्र शेतकऱ्यांना 90 टक्क्यांपर्यंत अनुदान दिले जाते. सरासरी एका मिनी ट्रॅक्टरसाठी शेतकऱ्यांना जास्तीत जास्त 3.15 लाख रुपयांचे अनुदान मिळू शकते. ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. त्यामुळे त्यांना ट्रॅक्टर खरेदी करताना अतिरिक्त कर्ज घेण्याची वेळ येत नाही.
पात्रता निकष
या योजनेसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांनी काही अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.जसे की, अर्जदाराकडे किमान 2 हेक्टर जमीन असावी. शेतकरी वैयक्तिक स्वरूपात किंवा बचत गटाच्या माध्यमातून अर्ज करू शकतो.
अर्जदार महाराष्ट्रातील कायमस्वरूपी रहिवासी असावा.
अर्ज प्रक्रिया
योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना महाडीबीटी पोर्टल (MahaDBT) वर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा लागतो. पोर्टलवर लॉगिन करून योजना निवडावी. आवश्यक माहिती भरून अर्ज सबमिट करावा. अर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट खात्यात जमा केली जाईल.
आवश्यक कागदपत्रे
आधार कार्ड
7/12 उतारा
बँक पासबुकची प्रत
आयकर प्रमाणपत्र (लागू असल्यास)
शेतकऱ्यांसाठी फायदे
आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर करून शेतीची कामे जलद व कमी खर्चात होतात.
मजुरीवरील अवलंबित्व कमी होते.
शेती उत्पादनात गुणवत्ता आणि प्रमाणात वाढ होते.
सामूहिक बचत गटाच्या माध्यमातून लहान शेतकऱ्यांनाही ट्रॅक्टरचा लाभ मिळतो.
दरम्यान, ट्रॅक्टर अनुदान योजना ही शेतकऱ्यांसाठी दिलासा देणारी ठरत आहे. योग्य पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना आधुनिक शेतीसाठी आवश्यक सुविधा मिळतील.