या योजनेत शेतकऱ्यांना त्यांच्या शेताभोवती काटेरी तारांचे कुंपण करण्यासाठी 90% अनुदान देण्यात येते. सरकारचा उद्देश शेतीचे वन्य प्राण्यांपासून होणारे नुकसान टाळणे आणि शेतकऱ्यांचा विश्वास टिकवणे हा आहे.
योजनेची वैशिष्ट्ये आणि नियम
अनुदानाचा लाभ - शेतकऱ्यांना दोन क्विंटल काटेरी तार आणि सुमारे 30 लोखंडी खांब हे साहित्य सरकार 90% अनुदानावर उपलब्ध करून देते.
advertisement
कुंपणासाठी पात्र ठरण्याचे निकष - शेतजमिनीवर कुठलाही कायदेशीर वाद अथवा अतिक्रमण नसावे. वन्य प्राणी नेहमी शेतात घुसत असल्याचे ग्राम स्थिती विकास समिती किंवा वन समितीच्या संमतीपत्रातून स्पष्ट असावे. शेती वन्य प्राण्यांच्या हालचालीच्या मार्गात असावी. कुंपणासाठी जागा निश्चित करताना वन्य प्राण्यांचा नैसर्गिक मार्ग बाधित होणार नाही, याची दक्षता घेणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया कशी आहे?
शेतकऱ्यांनी या योजनेसाठी अर्ज पंचायत समितीच्या कार्यालयात प्रत्यक्ष जाऊन करावा लागतो.अर्ज विहित नमुन्यात भरून संबंधित ग्रामविकास अधिकारी किंवा संवर्ग विकास अधिकारी यांच्याकडे सादर करावा.
अर्जासोबत लागणारी कागदपत्रे
सातबारा उतारा व गाव नमुना 8 अ – शेतजमिनीच्या मालकीची खात्री.
आधार कार्ड – ओळखपत्र म्हणून.
जात प्रमाणपत्र – मागासवर्गीय शेतकऱ्यांसाठी.
हक्कपत्र – एकापेक्षा अधिक मालक असल्यास इतर मालकांची परवानगी.
ग्रामपंचायतीचा दाखला – स्थानिक प्राधिकरणाची पुष्टी.
वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र – वन्य प्राण्यांच्या उपस्थितीचे प्रमाण.
वन व्यवस्थापन समिती/ग्राम स्थिती विकास समितीचे संमती पत्र – आवश्यक असल्यास.
दरम्यान, ‘तार कुंपण योजना’ ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी सुरक्षात्मक योजना आहे. वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान टाळून उत्पन्न वाचवण्यासाठी सरकारचा हा महत्त्वपूर्ण पुढाकार आहे. शेतकऱ्यांनी सर्व कागदपत्रांसह अर्ज वेळेत सादर करून योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संबंधित पंचायत समिती किंवा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.