TRENDING:

जुलैमध्ये मालामाल करणाऱ्या 3 भाज्या, कमी खर्चात कराल बक्कळ कमाई

Last Updated:

Agriculture News : खरीप हंगामात शेतकऱ्यांची लागवडीची कामे जोमात सुरू झाली आहेत. या काळात भाजीपाल्याची लागवड अत्यंत फायदेशीर ठरू शकते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : खरीप हंगामात शेतकऱ्यांची लागवडीची कामे जोमात सुरू झाली आहेत. या काळात भाजीपाल्याची लागवड अत्यंत फायदेशीर ठरू शकते. कारण या हंगामात भाज्यांची मागणी जास्त असते आणि कमी कालावधीत उत्पादन मिळवता येते. विशेषतः कारले, राजगिरा आणि टोमॅटो या भाज्यांची लागवड शेतकऱ्यांसाठी नफा मिळवून देणारी ठरू शकते.
agriculture news
agriculture news
advertisement

1) कारले

कारल्याची भाजी भारतभर मोठ्या प्रमाणात खाल्ली जाते. औषधी गुणधर्मांमुळे ती आहारात महत्त्वाची मानली जाते. पावसाळ्यात चांगल्या निचऱ्याची चिकणमाती असलेली जमीन या पिकासाठी अधिक उपयुक्त ठरते. एका एकर जमिनीसाठी सुमारे 500 ग्रॅम बियाण्यांची आवश्यकता असते. मात्र, रोपवाटिकेमार्फत लागवड केल्यास बियाण्याची मात्रा कमी लागते.

लागवडीसाठी उपयुक्त जाती - पुसा विशेष, पुसा हायब्रिड 1 व 2, अर्का हरित, पंजाब करेला 1 या आहेत. या जातींची निवड केल्यास उत्पादन आणि नफा दोन्ही वाढण्यास मदत होते. याशिवाय घराच्या अंगणात किंवा टेरेसवरही कारल्याची लागवड शक्य आहे.

advertisement

2) राजगिरा

राजगिरा ही एक अशी पालेभाजी आहे जी वर्षातून दोनदा, पावसाळा किंवा उन्हाळ्यात सहज उगम पावते. या पिकाची वाढ सुलभ असून तिची पाने अत्यंत पोषणमूल्यांनी भरलेली असतात.

गुणधर्म व फायदे

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

25-30 दिवसांत पहिली कापणी

90 दिवसांत 5 ते 6 वेळा कापणी शक्य

राजगिराची लागवड केवळ शेतामध्येच नव्हे तर स्वयंपाकघरातील बागेत, टेरेस गार्डनमध्ये देखील करता येते. बाजारातही याची चांगली मागणी आणि किंमत आहे.

advertisement

3) टोमॅटो

गेल्या काही दिवसांतील उष्णतेमुळे टोमॅटो पिकांचे मोठे नुकसान झाले आहे, त्यामुळे बाजारात त्याची किंमत 60 रुपये प्रति किलो पर्यंत वाढली आहे. त्यामुळे पॉलीहाऊसमध्ये टोमॅटो लागवड करणे ही नफ्याची संधी ठरू शकते.

उपयुक्त जाती

देशी - पुसा-120, पुसा रुबी, अर्का विकास, पुसा गौरव

संकरित - रश्मी, अविनाश-2, पुसा हायब्रिड-1, 2, 4

advertisement

या जाती उत्पादनक्षम असून बाजारात उत्तम दर मिळवून देऊ शकतात.

लागवडीसाठी महत्त्वाचे उपाय

भाजीपाला ओळीत व योग्य अंतर ठेवून लावावा. मुळांची वाढ आणि उत्पादन वाढवण्यासाठी योग्य प्रमाणात खत द्यावे.पावसात पाण्याचा निचरा होईल याची व्यवस्था करावी. रोगप्रतिबंधक औषधांची फवारणी वेळेवर करावी.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
सोयाबीनच्या दरात आज वाढ की घट? कोणत्या मार्केटमध्ये किती मिळाला भाव? Video
सर्व पहा

दरम्यान, जुलै महिन्यात कारले, राजगिरा आणि टोमॅटो यांसारख्या भाज्यांची लागवड करणे शेतकऱ्यांसाठी नक्कीच लाभदायक ठरेल. हवामानाच्या योग्य व्यवस्थापनासह आधुनिक शेतीतंत्रांचा वापर केल्यास उत्पादनात वाढ होईल आणि चांगला नफा मिळवता येईल.

advertisement

मराठी बातम्या/कृषी/
जुलैमध्ये मालामाल करणाऱ्या 3 भाज्या, कमी खर्चात कराल बक्कळ कमाई
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल