आले आवक
राज्याच्या कृषी मार्केटमध्ये आज एकूण 2 हजार 235 क्विंटल आल्याची एकूण आवक झाली. यापैकी मुंबई मार्केटमध्ये 1 हजार 081 क्विंटल सर्वाधिक आले आवक झाली. त्यास आल्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 3 हजार ते जास्तीत जास्त 7 हजार रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच अकोला मार्केटमध्ये आवक झालेल्या 154 क्विंटल आल्यास प्रतीनुसार 3 हजार ते 6000 रुपये भाव मिळाला.
advertisement
केळी
राज्याच्या मार्केटमध्ये केळीची एकूण 258 टन आवक राहिली. आज मुंबई मार्केटमध्ये 100 टन सर्वाधिक आवक होऊन त्यास 3 हजार ते 5 हजार रुपये सर्वसाधारण बाजार भाव मिळाला. तसेच जळगाव मार्केटमध्ये आवक झालेल्या 12 टन केळीस 200 ते 400 रुपये प्रतिटन बाजार भाव मिळाला.
Kalyan News: शेतीतला 'पूरक' व्यवसाय ठरला वरदान! कुकुटपालनातून लाखोंची कमाई!
अशी राहिली लिंबूची आवक
राज्याच्या मार्केटमध्ये एकूण 1224 क्विंटल लिंबूची आवक झाली. यापैकी सोलापूर मार्केटमध्ये 6850 नग आवक झालेल्या लिंबूस प्रतिनग एक रुपयाप्रमाणे बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 555 क्विंटल लिंबूस प्रतीनुसार 1800 ते 3800 रुपये प्रमाणे बाजार भाव मिळाला.
सोयाबीनचे दर दबावातच
राज्याच्या मार्केटमध्ये सोयाबीनची 73 हजार 474 क्विंटल एकूण आवक झाली. यापैकी जालना मार्केटमध्ये सर्वाधिक 24 हजार 599 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3380 ते 4207 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच लातूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 113 क्विंटल सोयाबीनला 4000 ते 4400 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजार भाव मिळाला. छत्रपती संभाजी नगर मार्केटमध्ये 97 क्विंटल सोयाबीनची आवक होऊन त्यास 3 हजार 625 ते 4 हजार 038 रुपये सर्वात कमी बाजार भाव मिळाला.
सोयाबीन खरेदी केंद्रे अद्याप सुरू नाहीत
अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने सोयाबीनसाठी 5 हजार 328 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असला. तरी शासकीय खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडून अवघ्या 4400 रुपयांमध्ये सर्वोत्तम दर्जाचे सोयाबीन लुटले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची फरफट आणि पदरात तोटा कायम आहे.