Soyabien Rate : शेतकऱ्यांच्या पदरात तोटा कायम, सोयाबीनच्या दरात वाढ नाहीच, आज काय मिळाला भाव?

Last Updated:

राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ.

+
News18

News18

मुंबई: गुरुवार दिनांक 9 ऑक्टोबर रोजी राज्यातील कृषी मार्केटमध्ये आवक झालेल्या महत्त्वाच्या शेतमालांच्या अपडेट्स जाणून घेऊ. आज आपण महत्त्वाच्या तीन शेतमालांमध्ये कांदा, सोयाबीन आणि मक्याची आवक आणि भाव पाहू.
कांद्याची उच्चांकी आवक 
राज्याच्या कृषीमार्केट मध्ये आज एकूण 2 लाख 25 हजार 621 क्विंटल कांद्याची एकूण आवक झाली. यापैकी नाशिक मार्केटमध्ये 1 लाख, 31 हजार 092 क्विंटल कांद्याची सर्वाधिक आवक झाली. त्यास कांद्याच्या प्रतीनुसार कमीत कमी 296 ते जास्तीत जास्त 1351 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. तसेच चंद्रपूर मार्केटमध्ये आवक झालेल्या 380 क्विंटल कांद्यास प्रतीनुसार 1300 ते 2500 रुपये सर्वाधिक भाव मिळाला.
advertisement
मक्याच्या दरास उठाव
राज्याच्या मार्केटमध्ये मक्याची एकूण 10 हजार 788 क्विंटल आवक राहिली. आज जळगाव मार्केटमध्ये 3065 क्विंटल मक्याची सर्वाधिक आवक होवून त्यास 1688 रुपये सर्वसाधारण बाजार भाव मिळाला. तसेच मुंबई मार्केटमध्ये आवक झालेल्या 412 क्विंटल मक्यास सर्वाधिक 3200 रुपये बाजार भाव मिळाला. तसेच पुणे मार्केटमध्ये आवक झालेल्या 3 क्विंटल मक्यास 2550 सर्वसाधारण बाजार भाव मिळाला.
advertisement
सोयाबीन उत्पादकांची फरपट 
राज्याच्या मार्केटमध्ये सोयाबीनची 54 हजार 111 क्विंटल एकूण आवक झाली. यापैकी जालना मार्केट मध्ये सर्वाधिक 24 हजार 158 क्विंटल आवक राहिली. त्यास प्रतीनुसार 3400 ते 4343 रुपये प्रतिक्विंटल बाजार भाव मिळाला. वर्धा मार्केटमध्ये आवक झालेल्या 1118 क्विंटल सोयाबीनला 3250 ते 4388 रुपये दरम्यान सर्वाधिक बाजार भाव मिळाला. नांदेड मार्केटमध्ये सर्वात कमी 2 क्विंटल सोयाबीनची आवक होवून त्यास 4050 रुपये सर्वसाधारण बाजार भाव मिळाला.
advertisement
सोयाबीन खरेदी केंद्रे अद्याप सुरू नाहीत 
अतिवृष्टीने हातातोंडाशी आलेल्या सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने सोयाबीनसाठी 5 हजार 328 रुपये प्रति क्विंटल हमीभाव जाहीर केला असला; तरी शासकीय खरेदी केंद्रे अद्याप सुरू करण्यात आलेली नाहीत. यामुळे खाजगी व्यापाऱ्यांकडून अवघ्या 4400 रुपयांमध्ये सर्वाउत्तम दर्जाचे सोयाबीन लुटले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची फरपट आणि पदरात तोटा कायम आहे.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
Soyabien Rate : शेतकऱ्यांच्या पदरात तोटा कायम, सोयाबीनच्या दरात वाढ नाहीच, आज काय मिळाला भाव?
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement