Bhaiya Gaikwad: 'हॅलो, भैय्या गायकवाड बोलतोय' म्हणणाऱ्या रिलस्टारला टोल नाक्यावर बेदम मारहाण, VIDEO समोर
- Published by:Sachin S
Last Updated:
भैय्या गायकवाडला या टोल कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण करत आहे, पण, त्याने व्हिडीओ तरी डिलीट करा, अशी विनवणी करत होता.
अविनाश कानडजे, प्रतिनिधी
छ.संभाजीनगर : 'हॅलो, भैय्या गायकवाड बोलतोय, किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष' असं म्हणून काम होतं की, नाही का मी येऊ, अशी दमबाजी करणााऱ्या रिलस्टार भैय्या गायकवाडला छत्रपती संभाजीनगरमध्ये टोल नाक्यावर बेदम मारहाण झाली. टोल घेण्यावरून झालेल्या क्षुल्लक वादातून भैय्या गायकवाड आणि टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाला. या वादातून टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांनी भैय्या गायकवाडला मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे.
advertisement
त्याचं झालं असं की, रिल स्टार भैय्या गायकवाड उर्फ गोरख गायकवाड हा आपल्या एका मित्रासोबत कारने छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रवास करत होता. कार संभाजीनगरच्या सावंगी समृद्धी टोलनाकावर पोहोचली. कारवर फास्ट टॅग नव्हता. त्यामुळे टोलसाठी शिल्लक पैसे द्यावे लागणार होते. यावरून भैय्या गायकवाड गाडीतून खाली उतरला. टोल कर्मचाऱ्यांशी आपल्या स्टाईलमध्ये बोलण्यास सुरुवात केली. बघता बघता टोल कर्मचारी आणि भैय्या गायकवाडमध्ये बाचाबाची झाली. व्हिडीओमध्ये दिसतंय की, टोल कर्मचाऱ्यांचा पगार किती आहे, यावरून त्यांना डिवचण्यात आलं.
advertisement
advertisement
एकतर आधीच कारवर फास्ट टॅग नाही, टोलचे पैसे द्यायलाही टाळाटाळ करायला आणि उलट आपल्यालाच दमबाजी करत असल्यामुळे टोल कर्मचारी कमालीचे संतापले. त्यामुळे ६ जणांनी मिळून भैय्या गायकवाडला चांगलाच चोप दिला. बेदम मारहाण करत असताना टोल कर्मचाऱ्यांनी भैय्या गायकवाडचा व्हिडीओ सुद्धा रेकॉर्ड केला.
एका व्हिडीओमध्ये दिसतंय की, भैय्या गायकवाडला या टोल कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण करत आहे, पण, त्याने व्हिडीओ तरी डिलीट करा, अशी विनवणी करत होता. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी अद्याप पोलीस स्टेशनमध्ये कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. भैय्या गायकवाडनेही पोलीस स्टेशन अजून गाठलं नाही. पण, भैय्या गायकवाडला मारहाणीचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.
advertisement
कोणत आहे भैय्या गायकवाड?
इंन्साटाग्रामवर अल्पवधीत फेमस झालेला भैय्या गायकवाड हा नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील धामोडा गावात राहणार आहे. भैय्या गायकवाडच्या आई-वडिलांचा मृत्यू लहानपणीच झाला होता. लहान वयात आई-वडिलांचं छत्र हरपलेल्या भैय्या गायकवाडचं बालपण खडतर होतं. त्यानंतर त्याने सामाजिक कामाचा वसा हाती घेतला. लोकांची छोटी मोठी काम तो करून देत होता. पुढे त्याने सोशल मीडियाचा वापर सुरू केला. 'हॅलो, भैय्या गायकवाड बोलतोय, किंग मेकर ग्रुपचा अध्यक्ष' असं म्हणत त्याची रिल सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली होती. अवघे ५०० फॉलोअर्स असलेला भैय्या गायकवाड आता
view commentsLocation :
Aurangabad [Aurangabad],Aurangabad,Maharashtra
First Published :
October 09, 2025 9:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Bhaiya Gaikwad: 'हॅलो, भैय्या गायकवाड बोलतोय' म्हणणाऱ्या रिलस्टारला टोल नाक्यावर बेदम मारहाण, VIDEO समोर