Varinder Ghuman Death : सर्जरीच्या 24 तासांतच प्रसिद्ध बॉडीबिल्डरचं निधन! सलमान खानसोबत 'या' फिल्ममध्ये केलं होतं काम
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Varinder Ghuman Death: आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा निर्माण करणारे बॉडीबिल्डर आणि अभिनेता वरिंदर घुम्मण यांचे आकस्मिक निधन झाले आहे.
मुंबई : पंजाबमधून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचा दबदबा निर्माण करणारे बॉडीबिल्डर आणि अभिनेता वरिंदर घुम्मण यांचे आकस्मिक निधन झाले आहे. मूळचे जालंधरचे असलेले वरिंदर घुम्मण यांना 'द ही-मॅन ऑफ इंडिया' या नावानेही ओळखले जात होते. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण पंजाबमध्ये आणि क्रीडाविश्वात शोककळा पसरली आहे.
advertisement
वरिंदर घुम्मण हे जालंधर बस्ती शेख येथील त्यांच्या घरातून बाजूच्या एका मायनर ऑपरेशनसाठी अमृतसरमधील फोर्टिस रुग्णालयात गेले होते. हे ऑपरेशन लहान असल्यामुळे ते त्याच दिवशी परत येणार होते. मात्र, शस्त्रक्रियेनंतर अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. ही बातमी ऐकून त्यांच्या चाहत्यांना तसेच पंजाबमधील खेळाडूंना त्यांच्या मृत्यूवर विश्वास बसत नाहीये.
advertisement
advertisement
वरिंदर घुम्मण हे पहिले भारतीय बॉडीबिल्डर होते, ज्यांना आयएफबीबी प्रो कार्ड (IFBB Pro Card) मिळाले होते. २०११ मध्ये त्यांनी ऑस्ट्रेलिया ग्रां प्रीमध्येही यश मिळवले होते. त्यांनी अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करून देशाचे नाव उंचावले होते. ते भारतातील बॉडीबिल्डिंग क्षेत्रासाठी एक मोठी प्रेरणा होते.
advertisement
advertisement
advertisement