Banana : रोज दोन केळी खाण्याचे फायदे, आजार पळतील दूर, या हेल्थ टिप्स नक्की वाचा

Last Updated:

केळी हे जगात सर्वात जास्त खाल्लं जाणारं फळ आहे. यात अनेक आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. सहज मिळणारं आणि पटकन खाता येणारं हे फळ आहे. म्हणून, तुमच्या आहारात त्याचा समावेश करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. दररोज दोन केळी खाण्याचे आरोग्य फायदे जाणून घेऊया. तुम्हाला कोणतीही आरोग्य समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या. 

News18
News18
मुंबई : केळी म्हणजे पटकन एनर्जी देणारा सोपा आणि सहज मिळणारा खाऊ. केळ्यांमधे अनेक पोषक घटक असतात. दररोज दोन केळी खाण्यास सुरुवात केली तर त्याचे अनेक सकारात्मक आरोग्य फायदे मिळू शकतात.
केळी हे जगात सर्वात जास्त खाल्लं जाणारं फळ आहे. यात अनेक आवश्यक जीवनसत्त्वं आणि खनिजं असतात. सहज मिळणारं आणि पटकन खाता येणारं हे फळ आहे. म्हणून, तुमच्या आहारात त्याचा समावेश करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्हाला कोणतीही आरोग्य समस्या असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्या.
ऊर्जेचा एक उत्तम स्रोत - केळी हे नैसर्गिक साखर आणि फायबरचं उत्तम मिश्रण आहे. यामुळे त्वरित आणि दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा मिळते. म्हणूनच खेळाडू आणि जिममध्ये जाणारे लोक वर्कआउटपूर्वी आणि नंतर केळी खातात.
advertisement
पचनसंस्था मजबूत करते - केळी पचनासाठी खूप फायदेशीर आहेत. केळ्यातील फायबर अन्न पचवण्यास मदत करते. त्यात प्रीबायोटिक्स देखील असतात, यामुळे आतड्यांमधे चांगल्या बॅक्टेरियाच्या वाढीला प्रोत्साहन देतात. बद्धकोष्ठतेचा त्रास कमी केळी हा चांगला पर्याय आहे.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर - केळ्यांमधे भरपूर प्रमाणात पोटॅशियम असतं, जे हृदयाच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेलं खनिज आहे. पोटॅशियम शरीरातील सोडियमच्या परिणामांचं संतुलन राखून रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते, ज्यामुळे उच्च रक्तदाब आणि हृदयरोगाचा धोका कमी होतो.
advertisement
दररोज दोन केळी खाल्ल्यानं शरीराला भरपूर पोटॅशियम मिळते, ज्यामुळे हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोकचा धोका कमी होतो.
तणाव दूर करण्यासाठी फायदेशीर - आजकाल ताणतणाव ही एक सामान्य समस्या बनली आहे.केळी देखील यामध्ये मदत करू शकतात. त्यामध्ये ट्रिप्टोफॅन असते, जे शरीराला "फील-गुड" हार्मोन सेरोटोनिनच्या निर्मितीसाठी आवश्यक असते. सेरोटोनिन मूड सुधारण्यास, तणाव कमी करण्यास आणि चांगली झोप घेण्यास मदत करते.
advertisement
अशक्तपणा कमी होतो - अशक्तपणा किंवा रक्ताची कमतरता शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे होते. केळ्यात मोठ्या प्रमाणात लोह असतं. हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी याची मदत होते. शिवाय, त्यात असलेलं व्हिटॅमिन बी6 शरीरात हिमोग्लोबिन उत्पादनासाठी जबाबदार असते.
वजन कमी करण्यास उपयुक्त - केळ्यांमधे कॅलरीज कमी आणि फायबर जास्त असतात. म्हणून, ते खाल्ल्यानं जास्त काळ पोट भरलेलं राहण्यास मदत होते, ज्यामुळे जास्त खाणं कमी होतं.
advertisement
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Banana : रोज दोन केळी खाण्याचे फायदे, आजार पळतील दूर, या हेल्थ टिप्स नक्की वाचा
Next Article
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement