शेतीच्या बांधावरून वाद पेटला, शेतकऱ्याने कुऱ्हाड उचलली अन्...,सोलापुरात धक्कादायक घटना
- Published by:Ajit Bhabad
Last Updated:
Agriculture News : बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या बांधाच्या कारणावरून झालेल्या वादातून एक शेतकरी एवढा संतप्त झाला की त्याने दुसऱ्या शेतकऱ्याचे तब्बल २०० केळीची झाडे उद्ध्वस्त करून मोठे नुकसान केले.
सोलापूर : बार्शी तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतीच्या बांधाच्या कारणावरून झालेल्या वादातून एक शेतकरी एवढा संतप्त झाला की त्याने दुसऱ्या शेतकऱ्याचे तब्बल २०० केळीची झाडे उद्ध्वस्त करून मोठे नुकसान केले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय आहे प्रकरण?
ही धक्कादायक घटना सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात घडली आहे. सागर घुगे आणि संतोष माळी या दोन शेतकऱ्यांच्या शेतांदरम्यान असलेल्या बांधाच्या सीमारेषेवरून वाद काही दिवसांपासून सुरू होता.
नुकसान झालेल्या शेतकरी सागर घुगे याला संतोष माळी याने “तुला बघून घेईन” अशी धमकी दिली होती. अखेर रागाच्या भरात त्यांनी आपली धमकी प्रत्यक्षात उतरवली आणि घुगे यांच्या शेतातील तब्बल १,००० केळीच्या झाडांपैकी २०० झाडांची निर्दयपणे तोडून टाकली.
advertisement
दरम्यान, सागर घुगे यांनी केळीची लागवड मोठ्या परिश्रमाने केली होती. त्यांनी सांगितले की, “या केळीच्या पिकासाठी आईचे सोने गहाण ठेवले होते. सिंचन, खत आणि मजूर यासाठी हजारो रुपये खर्च केले. आता माझे २०० झाडे उध्वस्त झाली आहेत. माझे मेहनतीचे सर्व श्रम वाया गेले.” या घटनेनंतर सागर घुगे याने पोलिस ठाण्यात संतोष यशवंत माळी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
October 09, 2025 11:46 AM IST
मराठी बातम्या/कृषी/
शेतीच्या बांधावरून वाद पेटला, शेतकऱ्याने कुऱ्हाड उचलली अन्...,सोलापुरात धक्कादायक घटना