Diwali Cleaning Tips : बाथरूम ते बेडरूम.. 'हे' पदार्थ वापरून स्वच्छ करा घराचा प्रत्येक कोपरा आणि वस्तू

Last Updated:
Home Cleaning Hacks And Natural Ways : सणासुदीचा काळ जवळ आला आहे आणि घराची साफसफाई ही प्रत्येकाची प्राथमिकता असते. पण अनेकदा महागडी रसायने वापरण्याऐवजी आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साध्या वस्तू वापरूनही घराला चकचकीत करता येते. या दिवाळीत तुमच्या घरातील प्रत्येक कोपरा स्वच्छ करण्यासाठी आज आम्ही तुम्हाला काही सोप्या आणि प्रभावी टिप्स सांगत आहोत.
1/9
आरसे पांढऱ्या व्हिनेगरने चमकावा : घरातील खिडक्या, बाल्कनीचे काच आणि इतर आरसे स्वच्छ करण्यासाठी पांढरा व्हिनेगर अत्यंत उपयुक्त आहे. यासाठी व्हिनेगर पाण्यात मिसळून एका स्प्रे बॉटलमध्ये भरा. हे मिश्रण खिडक्या, आरसे किंवा काचेच्या दरवाजांवर शिंपडा. काही मिनिटांनंतर मायक्रोफायबर कपड्याने पुसा. तुमचे आरसे अगदी नव्यासारखे चमकदार दिसतील.

advertisement
2/9
लिंबाने मायक्रोवेव्ह स्वच्छ करा : दिवाळीच्या निमित्ताने मायक्रोवेव्हची साफसफाई करणे आवश्यक आहे. लिंबू वापरून तुम्ही हे काम सहज करू शकता. यासाठी अर्धा लिंबू कापून त्याचा रस काढा आणि त्यात चार चमचे पाणी मिसळा. हे मिश्रण मायक्रोवेव्हमध्ये 10 मिनिटे गरम करा. वाफेमुळे आत जमलेले डाग आणि चिकटपणा सैल होतो. त्यानंतर एका स्वच्छ कपड्याने मायक्रोवेव्ह आतून साफ करा.

3/9
या पद्धतीने करा बाथरूम साफ : सिंक, नळ आणि बाथरूमच्या टाइल्सवर जमा झालेले डाग काढणे आता सोपे झाले आहे. यासाठी ऍपल सायडर व्हिनेगर आणि लिंबाचा रस एकत्र मिसळून डाग असलेल्या जागी लावा. 10-12 मिनिटांनंतर मायक्रोफायबर कपड्याने घासून साफ करा. याने बाथरूम चमकेल.

4/9
टाइलची ग्राउट साफ करण्याची पद्धत : बाथरूममधील टाइल्सच्या ग्राउटमधील घाण साफ करणे थोडे कठीण वाटते, पण या सोप्या उपायाने ते सहज शक्य आहे. हे साफ करण्यासाठी बेकिंग सोडा आणि हायड्रोजन पॅरोक्साइडची पेस्ट बनवा. ही पेस्ट ग्राउटवर लावून जुन्या टूथब्रशने ती जागा घासा. यानंतर पाण्याने साफ करा. ग्राउट चमकदार दिसेल.

5/9
बाथरूम फिटिंग्ज : नळ, शॉवर हेड आणि इतर बाथरूममधील घाण झालेल्या फिटिंग्जला चमकवण्यासाठी हा उपाय वापरा. बेकिंग सोडा आणि डिश सोपचा स्प्रे करून या वस्तूंवर लावा आणि पाच मिनिटांसाठी तसेच सोडा. त्यानंतर स्पंजने घासून साफ करा. यामुळे डाग तर निघतीलच, शिवाय बॅक्टेरियाही नष्ट होतील.

6/9
देवघर आणि मूर्तींची साफसफाई : मंदिरात आणि मूर्तीही दिवाळीत साफ करणे आवश्यक आहे. पितळेच्या मूर्तींना चमकवण्यासाठी हा उपाय वापरा. सिट्रिक ऍसिड आणि पाण्याची पेस्ट बनवून मूर्तींवर हळू हळू घासा. थोड्याच वेळात मूर्ती नव्यासारख्या चमकू लागतील.

7/9
पंखे आणि लाईट्स साफ करण्याचा सोपा उपाय : छतावरील पंखे आणि लाईट्सवर अनेकदा धूळ जमा होते, जे साफ करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. ते ओल्या कपड्याने किंवा एक्सटेंडेबल डस्टरने साफ करा. यामुळे तुम्ही सहजपणे उंचीवरील पंखे आणि लाईट्स स्वच्छ करू शकता.

8/9
गादी अशी करा साफ : गादीमध्ये धूळ, माइट्स आणि वास जमा होतो, ज्यामुळे दुर्गंधी येऊ शकते. गादीतील घाण, धूळ-माती आणि दुर्गंधी दूर करण्यासाठी बेकिंग सोडा आणि व्हिनेगर स्प्रेच्या मदतीने गादीवर शिंपडा. काही तासांनंतर व्हॅक्यूम क्लीनरने साफ करा. यामुळे दुर्गंधी आणि धूळ-माती सहज दूर होईल.

9/9
सोफा आणि पडदे साफ करण्याची पद्धत : दिवाळीत सोफा आणि पडदे साफ करणे हे मोठे काम असते. सोफा आणि पडदे व्हॅक्यूम क्लीनरच्या मदतीने थोड्याच वेळात साफ होऊ शकतात. तसेच काही पडदे पाण्याने देखील साफ करता येतात, जे धुण्यायोग्य असतात.

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement