घायवळ शस्त्र परवाना: योगेश कदमांबाबत गोगावलेंची भुवया उंचवणारी प्रतिक्रिया, म्हणाले, "एकनाथ शिंदे त्याची..."
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याप्रकरणी गृहराज्यमंत्री योगेश कदम अडचणीत सापडले आहेत. यावर शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ परदेशात पळून गेल्यानंतर पुणे पोलिसांनी घायवळ टोळीविरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. पोलिसांनी अलीकडेच निलेश घायवळच्या अहिल्यानगर आणि पुण्यातील दोन घरांवर छापेमारी केली. या छापेमारीत पोलिसांच्या हाती कोट्यवधी रुपयांची संपत्ती आणि कागदपत्रं लागली आहेत. यावेळी पोलिसांनी घायवळच्या घरात काही जिवंत काडतुसं देखील आढळून आली आहेत.
यानंतर आता निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ याच्याकडे शस्त्र असल्याचं देखील समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा शस्त्र परवाना शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिल्याचं समोर आलं आहे. एका गुंडाच्या भावाला अशाप्रकारे शस्त्र परवाना दिल्याने महायुती सरकारवर टीका केली जात आहे. या प्रकरणी ठाकरे गट आक्रमक झाला असून योगेश कदम यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केली आहे.
advertisement
दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या प्रतिक्रियेनंतर अनेकांच्या भुवया उंचवल्या आहेत. योगेश कदम यांनी निलेश घायवळच्या भावाला दिलेल्या शस्त्र परवाना प्रकरणाची चौकशी एकनाथ शिंदे करतील असं गोगावले यांनी म्हटलं आहे. त्यांना योगेश कदमांनी जारी केलेल्या शस्त्रपरवान्याबद्दल विचारलं असता त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
घायवळ शस्त्र परवान्याबद्दल विचारलं असता भरत गोगावले म्हणाले, "काल आम्ही याबाब बातम्यांमधून ऐकलं आहे. पण या सगळ्याची आम्हाला त्याची चौकशी करावी लागेल. मला त्याची पूर्ण माहिती नाही. राज्यमंत्र्यावर जो काही आरोप झाला आहे, त्याची आम्ही पुढील चौकशी करू किंवा एकनाथ शिंदे चौकशी करतील."
advertisement
दरम्यान गोगावले यांनी नवी मुंबई येथील नवी विमानतळाच्या नामकरणाबाबतही प्रतिक्रिया केली. विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव द्यावे, अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्री यांच्यासोबत याबाबत बैठका झाल्या. यातील अडथळे दूर करून दि बा पाटील यांचे नाव दिले जाईल. सरकार हे मान्य करेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 09, 2025 1:29 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
घायवळ शस्त्र परवाना: योगेश कदमांबाबत गोगावलेंची भुवया उंचवणारी प्रतिक्रिया, म्हणाले, "एकनाथ शिंदे त्याची..."