‘मिर्झापूर’चा थरार अन् रणवीरचा डान्स, ठाण्यातील या ठिकाणाची बॉलिवूडला भुरळ, शूटिंगचे दर काय?
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Namita Suryavanshi
Last Updated:
Entertainment: बॉलिवूडला मुंबईनंतर चित्रपट शूटिंगसाठी ठाण्याचीही भुरळ असल्याचे दिसत आहे. ठाण्यातील नमो सेंट्रल पार्क येथे शूटिंगसाठी दर निश्चित करण्यात आले आहेत.
ठाणे : मुंबई ही देशाची चित्रनगरी म्हणून ओळखली जाते, पण आता तिच्या शेजारी असलेलं ठाणेही या यादीत वेगाने आपली ओळख निर्माण करत आहे. गेल्या काही वर्षांत ठाण्यात अनेक हिंदी आणि मराठी मालिकांचं, तसेच वेगवेगळ्या चित्रपटांचं चित्रीकरण सुरू झालं आहे. ‘मिर्झापूर’सारख्या चर्चित वेब सिरीजपासून रणवीर सिंहसारख्या सुपरस्टारच्या चित्रपटांपर्यंत अनेक मोठ्या प्रोजेक्ट्सचं शूटिंग आता ठाण्यात होतंय. सेंट्रल पार्कसह ठाण्यातील विविध ठिकाणं आता निर्मात्यांसाठी नवे शूटिंग हब बनले आहेत.
आता कोलशेत-ढोकाळी परिसरातील ‘नमो सेंट्रल पार्क’ हे उद्यानही शूटिंगसाठीचं नवं आकर्षण केंद्र ठरणार आहे. या ठिकाणी लवकरच मोठ्या प्रमाणावर चित्रपट, जाहिराती, वेब सिरीज आणि प्री-वेडिंग शूट्स होणार आहेत. ‘मिर्झापूर’ वेब सिरीजचा तिसरा सिझन, तसेच रणबीर कपूर, रणवीर सिंग आणि अक्षय कुमार यांच्या आगामी चित्रपटांतील काही दृश्यांचं शूटिंगही या पार्कमध्ये होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ठाणे आता खरंच बॉलिवूडच्या कॅमेऱ्याचं नवं लक्ष्य ठरत आहे.
advertisement
या उद्यानात शूटिंगसाठी ठाणे महापालिकेने निश्चित केलेले दर पुढीलप्रमाणे आहेत —
डीएसएलआर फोटोग्राफी – 150 प्रतिदिन
प्री-वेडिंग शूट – ₹10,000
चित्रपट / डॉक्युमेंट्री – ₹20,000
वेब सिरीज / कमर्शिअल शूट – ₹2,00,000
जाहिरात / टीव्ही फिल्म – ₹1,00,000
advertisement
नागरिकांसाठी वेळ आणि शुल्क
नमो द ग्रँड सेंट्रल पार्क हे उद्यान सकाळी 6 ते 11 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या वेळात नागरिकांसाठी खुले असते. या ठिकाणी 12 वर्षांखालील मुलांना मोफत प्रवेश दिला जातो. प्रौढांना 20 रुपये, शनिवार आणि रविवारी 30 रुपये, तर सुट्टीच्या दिवशी देखील 30 रुपये प्रतिदिन शुल्क आकारले जाते. ज्येष्ठ नागरिकांना 10 रुपये प्रतिदिन, तर मासिक पास सकाळसाठी 250 रुपये आणि सकाळ आणि सायंकाळसाठी 500 रुपये आहे. तर चारचाकी वाहनाला 4 तासांसाठी 40 रुपये, सायकलला 20 रुपये आणि दुचाकीला 4 तासांसाठी 20 रुपये शुल्क आकारले जाते.
advertisement
कसे आहे उद्यान?
‘नमो सेंट्रल पार्क’ हे 20.5 एकरांवर पसरलेले उद्यान असून, येथे काश्मीर, चीन, मोरोक्को आणि जपान थीमवरील सुंदर बागा, तसेच रेस्टॉरंट, कॅफेटेरिया, क्रीडांगण अशा सुविधा आहेत. गेल्यावर्षी 8 फेब्रुवारी 2024 रोजी या उद्यानाचे लोकार्पण झाले. 3500 हून अधिक झाडांच्या हरिताईने नटलेलं हे उद्यान नागरिकांसाठी आणि चित्रनिर्मात्यांसाठी एक आकर्षक ठिकाण ठरणार आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
October 09, 2025 1:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
‘मिर्झापूर’चा थरार अन् रणवीरचा डान्स, ठाण्यातील या ठिकाणाची बॉलिवूडला भुरळ, शूटिंगचे दर काय?