शनिदेवाने टेन्शन वाढवलं! २०२६ मध्येही या राशींची साडेसाती पाठ सोडणारच नाही, प्रचंड नुकसान होणार

Last Updated:
Astrology News : वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीदेवाला न्यायाचा आणि कर्मफल देणारा देव मानले जाते. त्यामुळे “शनीची साडेसाती” (Shani Sade Sati) हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते.
1/6
astrology news
वैदिक ज्योतिषशास्त्रात शनीदेवाला न्यायाचा आणि कर्मफल देणारा देव मानले जाते. त्यामुळे “शनीची साडेसाती” (Shani Sade Sati) हा शब्द ऐकला की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. कारण या काळात व्यक्तीच्या जीवनात चढ-उतार, परीक्षा आणि संघर्ष वाढतात, असे मानले जाते. पण ज्यांच्या कुंडलीत शनी शुभ स्थितीत असतो, त्यांच्यासाठी हीच साडेसाती यश, प्रतिष्ठा आणि स्थैर्य देणारी ठरते.
advertisement
2/6
astrology
शनी साडेसाती म्हणजे काय? ज्योतिषशास्त्रानुसार, जेव्हा शनीदेव कोणत्याही राशीच्या जन्मचंद्रापूर्वीच्या, जन्मचंद्राच्या आणि त्यानंतरच्या राशीत भ्रमण करतात, तेव्हा एकूण साडेसात वर्षांचा कालावधी ‘साडेसाती’ म्हणून ओळखला जातो. या काळात शनी व्यक्तीच्या कर्मांची तपासणी करतो आणि त्यानुसारच फळ देतो. शनी अत्यंत न्यायप्रिय ग्रह मानला जातो. तो वाईट कर्म करणाऱ्यांना शिक्षा तर सद्‌कर्म करणाऱ्यांना यश आणि कीर्ती देतो. त्यामुळे साडेसातीचा परिणाम प्रत्येक व्यक्तीच्या कर्मानुसार वेगवेगळा असतो.
advertisement
3/6
सध्या कोणत्या राशींवर शनीची साडेसाती आहे?
सध्या कोणत्या राशींवर शनीची साडेसाती आहे?  - २०२५-२६ या काळात शनी मीन राशीत भ्रमण करत आहे आणि पुढील दोन वर्षे या राशीत राहणार आहे. त्यामुळे सध्या तीन राशींवर साडेसातीचा प्रभाव आहे. कुंभ राशी (साडेसातीचा शेवटचा टप्पा), मीन राशी (मधला टप्पा), मेष राशी (सुरुवातीचा टप्पा) या राशीच्या जातकांना मानसिक अस्वस्थता, आर्थिक चढ-उतार, आरोग्याच्या समस्या आणि नातेसंबंधातील तणाव जाणवू शकतो. मात्र ज्यांच्या कुंडलीत शनी शुभ स्थितीत आहे, त्यांना साडेसातीचा काळ आत्मपरीक्षण, यश आणि प्रगतीचा कालखंड ठरू शकतो.
advertisement
4/6
साडेसातीपासून मुक्ती कधी मिळणार?
साडेसातीपासून मुक्ती कधी मिळणार?  कुंभ राशी – साडेसातीचा शेवटचा टप्पा सुरू असून २०२८ च्या सुरुवातीला हा काळ संपेल. मीन राशी – दुसरा टप्पा सुरू असून २०३० च्या मध्यापर्यंत प्रभाव राहील. मेष राशी – पहिला टप्पा सुरू असून २०३३ पर्यंत साडेसातीचा परिणाम कायम राहणार आहे.
advertisement
5/6
शनीच्या साडेसातीतील उपाय
शनीच्या साडेसातीतील उपाय -  ज्योतिषशास्त्रानुसार, शनीच्या प्रसन्नतेसाठी खालील उपाय उपयुक्त मानले जातात. प्रत्येक शनिवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करून त्यावर पाणी अर्पण करा. शनीदेवाला मोहरीचे तेल अर्पण करा. शनीच्या मूर्तीसमोर थेट उभे राहू नका किंवा त्यांच्या डोळ्यात पाहू नका. कांस्य पात्रात मोहरीचे तेल घेऊन आपले प्रतिबिंब पाहा आणि नंतर ते तेल दान करा. गरीब व वृद्ध व्यक्तींना अन्नदान आणि मदत करा.
advertisement
6/6
या काळात टाळावयाच्या गोष्टी
या काळात टाळावयाच्या गोष्टी -  साडेसातीच्या काळात खालील गोष्टींपासून दूर राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खोटे बोलणे, फसवणूक किंवा अपमान करणे. वडीलधाऱ्यांचा किंवा दुर्बल व्यक्तींचा छळ टाळा. मद्यपान, नशा किंवा चुकीचे काम करू नका.
advertisement
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
View All
advertisement