Marathi Actress: 'वडील गेले, मोठं दुःख पचवलं' मराठी अभिनेत्री पडलेली एकटी, सांगितलं आता कोणावर अवलंबून

Last Updated:
Marathi Actress: पडद्यावर कणखर आणि बिनधास्त दिसणारे कलाकार खऱ्या आयुष्यात खूप साधे आणि भावूक असतात. अशीच एक अभिनेत्री जिचे वडील गेल्यावर खूप अडचणींना तोंड द्यावं लागलं.
1/7
'पुढचं पाऊल' या लोकप्रिय मराठी मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या 'अक्कासाहेब किर्लोस्कर' म्हणजेच अभिनेत्री हर्षदा खानविलकर. त्यांची अक्कासाहेबांची भूमिका प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतली.

advertisement
2/7
हर्षदा खानविलकर यांनी नुकताच त्यांच्या आयुष्यातील कठीण प्रसंग सांगितला जे ऐकून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्यांनी वडील गेल्यावर बहिणीसोबतचं नातं कसं घट्ट झालं ते सांगितलं.

3/7
‘झी मराठी पुरस्कार 2025’ सोहळ्यात हर्षदा खानविलकर यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांना सरप्राइज म्हणून त्यांच्या आयुष्यातील खास व्यक्तीला मंचावर बोलावण्यात आलं. ही खास व्यक्ती होती त्यांची धाकटी बहीण अर्चना.

4/7
बहिणीला पाहताच हर्षदा क्षणभर थबकल्या… आणि मग त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. मंचावर दोघींची घट्ट मिठी झाली आणि त्या क्षणी सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. या प्रसंगी हर्षदा यांनी बहिणीबद्दल एक भावनिक आठवण शेअर केली.

5/7
हर्षदा म्हणाल्या,
हर्षदा म्हणाल्या, "अर्चना माझी धाकटी बहीण आहे. लहानपणी आमचं पटायचं नाही. पण वडील गेले आणि आयुष्यच बदललं आणि आमचं नातं खूप घट्ट झालं. बाबा गेल्यानंतर आम्ही दोघी एकमेकींसाठी सर्वकाही झालो."
advertisement
6/7
त्या पुढे हसत म्हणाल्या,
त्या पुढे हसत म्हणाल्या, "आज अर्चना माझ्यासाठी फक्त बहीण नाही. ती माझी मुलगी आहे, आई आहे आणि सर्वात जवळची मैत्रीण आहे. तिचं सर्वात मोठं गिफ्ट म्हणजे तिचा मुलगा. त्याला मी माझा ‘बुढापे का सहारा’ म्हणते. त्याच्यासारखं मौल्यवान गिफ्ट मला आयुष्यात कुणी देऊ शकत नाही."
advertisement
7/7
दरम्यान, हर्षदा खानविलकर सध्या ‘लक्ष्मी निवास’ या मालिकेत लक्ष्मीची भूमिका साकारत आहेत. टीव्हीवर त्या सहसा कणखर आणि दबंग व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ओळखल्या जातात. मात्र खऱ्या आयुष्यात त्या खूपच मृदू स्वभावाच्या आहेत.

Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज; शेवटची तर मस्ट वॉच
Crime-Thriller ची मेजवानी! Prime Video वर पाहा 'या' 7 दमदार सीरीज
    View All
    advertisement